महाराष्ट्र

Religious News : भाविकांसाठी खूशखबर… श्री भीमाशंकर मंदिर पूर्णवेळ खुले

श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून पहाटे पाच ते रात्री साडेनऊ पर्यंत घेता येणार दर्शन

पुणे, महाराष्ट्र मिरर Religious News : धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला श्रावण महिना गुरूवारपासून (दि.१३) सुरू होत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून भाविकांना प्रतिक्षा असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आता पूर्णवेळ खुले करण्यात आले आहे. पहाटे पाच ते रात्री साडेनऊ पर्यंत विनाअडथळा भाविकांना दर्शन घेता येणार आहे. तसेच, श्रावण महिन्यात भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची यात्रा नियोजनाची जय्यत तयारी सुरू आहे.Religious News

पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात श्री क्षेत्र भीमाशंकर श्रावणी सोमवार यात्रा नियोजन बैठक पार पडली.
या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खेडचे आमदार बाबाजी काळे, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, कार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे, सरपंच दत्तात्रय हिले, सविता कोकाटे, उपविभागी अधिकारी अर्चना तांबे, अनिल दोंदे आदी उपस्थित होते.

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मंदिर विकासाची कामे सुरू असल्याने या काळात दर्शनाची वेळ मर्यादित करण्यात आली होती. या काळात दर्शनाची वेळ सकाळी ७ ते ११ अशी होती. मात्र, सध्या ही कामे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे दर्शन व्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यात आली असून पहाटे वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.Religious News

भगवान शंकरांना समर्पित असणाऱ्या श्रावण महिन्याला १३ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या महिन्यांत भाविक मोठ्या श्रद्धेने भगवान शंकराची आराधना करत असतात. याकाळात शिव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.

श्री क्षेत्र भीमाशंकर येथेही भाविकांची या काळात मोठी गर्दी होते. त्यामुळे वाढती गर्दी विचारात घेता एस टी महामंडळावर पूर्ण विसंबून न राहता गाड्यांचा वापर करून वाहनतळ ते मंदिर ही वाहतूक करावी. याचे पोलिसांनी नियोजन करावे, खाजगी वाहन शुल्क हे देखील एसटी च्या एवढेच असावे असे नियोजन करावे. मंचर, राजगुरुनगर , नारायणगाव या ठिकाणावरून जादा गाड्या सोडल्या जाव्यात.भीमाशंकरमध्ये पोलीस चौकी मंजूर आहेत याला पूर्णवेळ कर्मचारी देण्यात यावेत. वाहन तळावर एक पोलीस उपनिरीक्षक आणि मंदिरापाशी एक पोलीस उपनिरीक्षक नेमला जावा, बंद असलेली भीमाशंकर पाणी योजना सुरू करण्यात यावी आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.Religious News

प्लास्टिक बंदी विरोधात कडक कारवाई करावी

भीमाशंकर मंदिर आणि परिसर पूर्णपणे प्लास्टिक मुक्त करण्यासाठी वनविभागाने कडक कारवाई करावी, तसेच प्लास्टिक वापराच्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

व्हीआयपी दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग

अभिषेक आणि व्हीआयपी दर्शनासाठी पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी बुकिंग प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीने करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली.Religious News

तहसीलदारांकडे सदस्य सचिवपद

भीमाशंकर मंदिर खेड तालुक्यात असल्याने देवस्थानच्या नियोजनासाठी खेडचे तहसीलदार सदस्य सचिव असावेत, अशी मागणी करण्यात आली. पूर्वी खेडचे तहसीलदार सदस्य सचिव होते; मात्र मध्यंतरी हा बदल करण्यात आला होता.

निवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती

भीमाशंकर येथील विविध कामांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी निवृत्त उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्याचे मानधन देवस्थानकडून देण्यात येणार असून, या निर्णयाला देवस्थानच्या अध्यक्षांनी अनुमोदन देत पुढील कार्यवाही करण्याचे सांगितले.Religious News

Religious News

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button