मुंबई
Trending

Breaking News : चंदीगड, मोहाली आणि पंचकुलामध्ये हाय अलर्ट, हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर सायरन वाजले, सीए परीक्षाही रद्द

Breaking News : बीसीपीएचचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांनी सांगितले आहे की, परिस्थिती लक्षात घेता, बार कौन्सिलने 9 मे रोजी पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमधील सर्व न्यायालयांमध्ये नो वर्क डे पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

ANI :- पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी छावण्यांवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर हल्ला करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. 8 आणि 9 मे च्या मध्यंतरी रात्री, पाकिस्तानी सैन्याने भारतावर अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, जी भारतीय सैन्याने हवेतच नष्ट केली.

दरम्यान, शुक्रवारी चंदीगडमधील हवाई दलाच्या तळावरून हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. चंदीगड प्रशासनानेही सर्वसामान्यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. चंदीगड डीसीने सर्व लोकांना घरातच राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.यासोबतच लोकांना बाल्कनीपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.चंदीगडमध्येही हल्ल्याची शक्यता दर्शविणारे सायरन वाजत आहेत. चंदीगड व्यतिरिक्त, मोहालीमधील लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंजाबमध्ये परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्याचे शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैंस म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता, पंजाबमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे पुढील तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

गुरुवारी रात्री पंजाबमधील फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, अमृतसर, गुरुदासपूर आणि तरनतारन या सहा सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंजाबमधील काही सीमावर्ती गावांमधील लोक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होऊ लागले आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button