महाराष्ट्र

Rain Update : महाबळेश्वर, पाचगणीसह सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद!

Rain Update : रेड आणि ऑरेंज अलर्टमुळे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

सातारा, महाराष्ट्र मिरर

Rain Update : सातारा जिल्हा आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, जागतिक वारसास्थळ असलेला कास पठार आणि प्रसिद्ध ठोसेघर धबधब्यासह सर्व प्रमुख पर्यटनस्थळे पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर सार्वजनिक सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ( Rain Update tourist places closed)

२४ तासांत महाबळेश्वरमध्ये ५१३ मिमी पाऊस

गेल्या २४ तासांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा जोर प्रचंड वाढला आहे. साताऱ्या शेजारील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात ६७० मिमी, तर मुळशी तालुक्यात ६६० मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील मुख्य पर्यटन केंद्र असलेल्या महाबळेश्वरमध्ये तब्बल ५१३ मिमी पावसाची नोंद झाली असून, हा राज्यातील सर्वाधिक पाऊस असलेल्या भागांपैकी एक ठरला आहे. सततच्या या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळणे, रस्ते खचणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका कमालीचा वाढला आहे. (Rain Update)

धोकादायक ठिकाणी ‘नो एंट्री’; पोलीस बंदोबस्तात वाढ

हवामान विभागाने ७ जुलै रोजी सातारा जिल्ह्यासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करत सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अत्यंत तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून जिल्हा प्रशासनाने नदीकिनाऱ्यांचे भाग, धबधबे, तलाव आणि इतर धोकादायक पर्यटन स्थळांवर नागरिकांच्या व पर्यटकांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घातली आहे. (Rain Update)

Ashadhi wari 2026 : आळंदी जलमय, वारकऱ्यांसाठी PMC कडून पाणीकपात तात्काळ मागे

धोकादायक क्षेत्रांमध्ये ‘नो एंट्री’ (प्रवेश बंदी) आणि ‘धोकादायक क्षेत्र’ असे फलक लावण्याचे काम प्रशासनाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. पर्यटकांची गर्दी रोखण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी मुख्य पर्यटन पॉईंट्सवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि सातारा या डोंगराळ तालुक्यांमधील सर्व शासकीय यंत्रणांना आपत्ती व्यवस्थापन उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत. दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या गावांमधील तसेच मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.(Rain Update)

RED ALERT FOR MUMBAI, PUNE GHATS AS IMD WARNS OF EXTREMELY HEAVY RAIN

या विस्थापित नागरिकांसाठी स्थानिक शाळा, महाविद्यालये, समाजमंदिरे आणि शासकीय इमारतींमध्ये तात्पुरती पुनर्वसन केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये राहण्याची सोय, पिण्याचे शुद्ध पाणी, अन्न आणि वैद्यकीय मदत पुरवण्याची चोख व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.(Rain Update)

जिल्हा प्रशासनाचे आवाहन
पूर किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ते, पूल अथवा मोऱ्या पाण्याखाली गेल्यास ते रस्ते तात्काळ वाहतुकीसाठी बंद केले जातील. अशा ठिकाणी बॅरिकेड्स लावून पोलीस तैनात केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः पर्यटकांनी या काळात घाट रस्त्यांवरून प्रवास करणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Rain Update)

नागरिकांना हवामानाचा अंदाज, धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग आणि नद्यांच्या पाणीपातळीची अचूक माहिती मिळावी यासाठी सोशल मीडिया, स्थानिक वृत्तवाहिन्या, दवंडी आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या माध्यमातून सातत्याने अपडेट्स दिले जात आहेत. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये, नगरपरिषदा आणि पंचायत समित्यांमधील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष (Disaster Management Control Rooms) २४ तास कार्यरत ठेवण्यात आले आहेत.

Pune Rain : रेड अलर्टमुळे सिंहगड पर्यटकांसाठी बंद

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जाहीर करण्यात आलेल्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. ( Rain Update)

पर्यटकांसाठी बंद असलेली मुख्य ठिकाणे

महाबळेश्वर (सर्व पॉईंट्स)
पाचगणी
ठोसेघर धबधबा
भांबवली-वजराई धबधबा
कोयना धबधबा व परिसर
कास पठार (जागतिक वारसास्थळ)
सज्जनगड किल्ला (Rain Update)

कोयना धरणात एकाच रात्रीत ५ टीएमसी पाणीसाठा वाढला

गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात ढगफुटीसदृश पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक ४०० मिलीमीटर पाऊस पडला असून, कोयनानगर येथे ३१९ मिलीमीटर आणि नवजा पाचगणी परिसरात २७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. डोंगरमाथ्यावरून येणारे पाण्याचे प्रचंड प्रवाह थेट धरणात विसावत असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.

धरणात ९३ हजार क्युसेक्सने पाण्याची आवक
पाणलोट क्षेत्रातील या जलमय परिस्थितीमुळे सध्या कोयना धरणात प्रतिसेकंद तब्बल ९३,००० क्युसेक्स (Cubic Feet per Second) या प्रचंड वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात होणारी ही विक्रमी वाढ पाहता, येत्या काही दिवसांत जलसंपदा विभागाकडून धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग करण्याबाबतची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
धरणातील पाण्याची आवक अशीच सुरू राहिल्यास कोयना नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडावे लागू शकते. त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या सर्व गावांना, तसेच सखल भागातील नागरिकांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Rain Update)

View this post on Instagram

A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button