Kohlapur news : ‘गोकुळ’ गुजरात लॉबीला विकण्याचा डाव;संजय राऊत यांचा फडणवीसांवर आरोप
Kohlapur news :कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या समविचारी पॅनलला डावलून पराभूत गटाच्या हातात गोकुळचा कारभार देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. गोकुळ गुजरात लॉबीला विकण्याचा डाव सरकारकडून आखला जात असल्याचा दावाही राऊत यांनी केला. हा प्रकार महाराष्ट्र आणि शेतकऱ्यांशी बेईमानी असल्याचे ते म्हणाले.https://maharashtramirror.com/ Kohlapur News
राऊत म्हणाले, गोकुळच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी ज्या पॅनलला बहुमत दिले, त्यांच्याच हाती कारभार सोपविणे अपेक्षित आहे. मात्र, निवडून आलेल्या पॅनलला डावलून पराभूत झालेल्यांना पुन्हा सत्तेत आणण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारने चार संचालक नेमण्याची भूमिका घेतली असल्यास ती लोकशाही आणि शेतकऱ्यांच्या कौलाचा अनादर करणारी आहे, अशी टीका त्यांनी केली..https://maharashtramirror.com/ Kohlapur News
सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या भावना समजत नसल्याचा आरोप करत राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधला. लोकशाही मार्गाने सरकार स्थापन झाल्याचा दावा करणारे सत्ताधारी गोकुळच्या निवडणुकीतील लोकशाही कौल का मान्य करत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “लोकशाही मार्गाने ज्या पॅनलचा विजय झाला, तो तुम्हाला पचत नसेल, तर तुम्ही महाराष्ट्रात राजकारण करायला लायक नाहीत,” असे राऊत म्हणाले. बहुमताचा अनादर करून पराभूत झालेल्यांना सत्तेत आणण्याचा प्रयत्न झाल्यास कोल्हापुरातील जनता रस्त्यावर उतरून जाब विचारेल, असा इशाराही त्यांनी दिला.
साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या कौलाचा अनादर?
गोकुळशी संबंधित साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या कौलाचा मुख्यमंत्री आणि केंद्रीय सहकारमंत्र्यांनी आदर करावा, असे राऊत यांनी म्हटले. संविधान आणि नियम बदलून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याची टीका त्यांनी केली. भाजपच्या सत्ताधाऱ्यांना मस्ती आली असून, जनताच त्यांची ही मस्ती उतरवेल, असेही ते म्हणाले.



