मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
सूर्यकुमार यादवची तुफानी खेळी! १५ चेंडूंत अर्धशतक, २१ चेंडूंत नाबाद ६० धावा; मुंबईचा दणदणीत विजयबसमधील गर्दीचा फायदा घेत ७३ वर्षीय महिलेची सोन्याची बांगडी चोरीलानॉर्थ मेन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २१.४ कोटींचे भूसंपादनएमपीएससीच्या नऊ परीक्षांतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी मुदतवाढ; २३ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करा'जिजाई'वर पार्थ पवारांची आमदारांसोबत खलबतेआळंदी जवळील गावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

Shreya Kadam : रायगडच्या श्रेया कदमची राष्ट्रीय प्रेरणा कार्यक्रमासाठी निवड

पनवेल जितिन शेट्टी : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे विकसित भारत प्रकल्पांतर्गत इयत्ता ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी गुजरात येथे आयोजित राष्ट्रीय प्रेरणा कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते दि.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Shreya Kadam : रायगडच्या श्रेया कदमची राष्ट्रीय प्रेरणा कार्यक्रमासाठी निवड

पनवेल जितिन शेट्टी : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे विकसित भारत प्रकल्पांतर्गत इयत्ता ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी गुजरात येथे आयोजित राष्ट्रीय प्रेरणा कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयाच्या मराठी माध्यमातील विद्यार्थिनी श्रेया मच्छिंद्र कदम हिची निवड झाली आहे.

या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्रेयाचे अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी रायगड विभागीय अधिकारी एम. के. कोंगेरे, सहाय्यक विभागीय अधिकारी व्ही. यू. जगताप, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, बाळासाहेब कारंडे, श्री. गुजर आणि शिक्षक अनिल पाटील उपस्थित होते.

हेही वाचा: Eknath Khadse : 'खराडी रेव्ह पार्टी' कट: एकनाथ खडसेंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार!

शेअर करा