मुख्य मजकुराकडे जा

Pune News : भरधाव दुचाकीच्या धडकेत ५० वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : आर.टी.ओ.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

भरधाव दुचाकीच्या धडकेत ५० वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू आरटीओजवळ मेट्रो स्टेशनखाली भीषण अपघात
भरधाव दुचाकीच्या धडकेत ५० वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू आरटीओजवळ मेट्रो स्टेशनखाली भीषण अपघात

Pune News : आरटीओजवळ मेट्रो स्टेशनखाली भीषण अपघात

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : आर.टी.ओ. जवळील मेट्रो स्टेशनखाली दुचाकीस्वाराने दिलेल्या जोरदार धडकेत एका अज्ञात पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मंगळवार पेठेतील आरटीओजवळील मेट्रो स्टेशनखाली घडली. मोनल गायकवाड (वय ४०, रा. माळवाडी, हडपसर) असे अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. पोलीस अंमलदार विश्वनाथ नाळकर यांनी याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.https://maharashtramirror.com/

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोनल गायकवाड याने आपली दुचाकी वाहतुकीच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, अतिशय बेदरकारपणे आणि भरधाव वेगात चालवली. रस्त्याने जाणाऱ्या एका अंदाजे ५० वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौगुले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper