Pune News : मुलींचे जन्मदाखले आता विनामूल्य मिळणार : श्रीनाथ भिमाले
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : शहरात जन्मलेल्या मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आणि समाजात स्त्री-सन्मानाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मुलींचे जन्मदाखले विनामूल्य देण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता.
1 मिनिट वाचन

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : शहरात जन्मलेल्या मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आणि समाजात स्त्री-सन्मानाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मुलींचे जन्मदाखले विनामूल्य देण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुणे शहरातून स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि महिलांच्या हक्कांसाठी ऐतिहासिक कार्य केले. त्यामुळे त्यांच्या कार्याचा वारसा जपणे ही पुणे महापालिकेची सामाजिक जबाबदारी आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव दूर करण्यासाठी मुलीच्या जन्माकडे आनंद आणि अभिमानाची बाब म्हणून पाहण्याची गरज असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
मुलीच्या जन्मानंतर कुटुंबावर कोणताही अनावश्यक आर्थिक भार पडू नये तसेच संस्थात्मक पातळीवर तिच्या जन्माचा सन्मान व्हावा, यासाठी जन्म-मृत्यू नोंदणी विभागामार्फत मुलींचे जन्मदाखले कोणतेही शुल्क न आकारता देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.मुलीचा जन्म हा कुटुंबासह समाजासाठीही सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्याचा प्रयत्न असल्याचे
भिमाले म्हणाले.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




