पुणे

Pune News : सर्वपित्री अमावस्येला ८२ बेवारस अस्थींचे विसर्जन


Pune News : राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महानगरपालिकेचा संयुक्त उपक्रम; यंदा १६ वे वर्ष

Pune News :पुणे : मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीच्या अस्थींचे विधिवत विसर्जन व्हावे, या माणुसकीच्या भावनेतून राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने बेवारस मृतांच्या अस्थींचे पूजन करून विसर्जन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. सर्वपित्री अमावस्येनिमित्त यंदा ८२ बेवारस अस्थींचे विधिवत पूजन करून नदीत विसर्जन करण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News

राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महानगरपालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे यंदा १६ वे वर्ष आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाट येथे या अस्थींचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी मंदार रांजेकर, सदाशिव कुंदेन आणि अमर लांडे उपस्थित होते.

सदाशिव कुंदेन म्हणाले, हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार, मृत व्यक्तीच्या अस्थींचे विसर्जन केल्याने आत्म्यास शांती व मोक्ष प्राप्त होतो, अशी धारणा आहे. मात्र, अपघात किंवा अन्य कारणांमुळे मृत्युमुखी पडलेल्या काही व्यक्तींची ओळख पटत नाही. अशा मृतांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी त्यांचे नातेवाईक उपलब्ध नसतात. त्यामुळे या मृतांनाही सन्मानाने अखेरचा निरोप मिळावा आणि त्यांच्या अस्थींचे विधिवत विसर्जन व्हावे, या उद्देशाने राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने दरवर्षी सर्वपित्री अमावस्येला हा उपक्रम राबविण्यात येतो.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button