Pune Crime News | कोंढवा : पतीला जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार करणारा आरोपी गजाआड
Pune Crime News | कोंढवा पोलिसांकडून आरोपीस शिफातीने अटक
पुणे, दि. २१ मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News
पतीला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमास कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ऑक्टोबर २०२३ पासून आरोपी हा पोलिसांना चकवा देत होता.
आरोपी अश्रफ शेख, वय 22 वर्ष, रा. शिवनेरी नगर, कोंढवा, पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कोंढवा पोलीस स्टेशन कडील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,कोंढवा पोलिस स्टेशन यांनी तपास पथकाला आदेशित केले होते. आज दि. 21 रोजी कोंढवा पोलिस स्टेशन गु र न 1073/2023 भा द वि कलम 376 2 एन, 323,504,506,34 मधील आरोपी अश्रफ शेख याचा शोध घेत असता पोलिस हवालदार अमोल हिरवे व पोलिस अम शशांक खाडे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार आरोपी शिवनेरी नगर ,कोंढवा येथे राहते घरी येणार आहे. बातमीवरून आरोपी अश्रफ शेख, वय 22 वर्ष त्याचे राहते घरी शिवनेरी नगर ,कोंढवा, पुणे येथून ताब्यात घेण्यात आले.
सदर कामगिरी Pune Police अमीतेश कुमार पोलिस आयुक्त, मनोज पाटील अप्पर पोलिस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग, ए राजा पोलिस उप आयुक्त,परिमंडळ 5, गणेश इंगळे सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे, संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, मनसिंघ पाटील साहेब पोलिस निरीक्षक गुन्हे कोंढवा यांचे मार्गदर्शना खाली लेखाजी शिंदे सहा पो निरी, बालाजी डिगोले पोलिस उप नरीक्षक , पो हवा अमोल हिरवे, पोलिस हवा राहुल वंजारी, पोलीस अंमलदार अभिजित रत्नपारखी, सुहास मोरे, पोलीस अंमलदार थोरात, पोलीस अंमलदार अक्षय शेडगे, पोलीस अंमलदार गरुड, पोलीस अंमलदार भोसले, विकास मरगळे, राहुल रासगे, शशांक खाडे कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.
Pune Alert | पालकांनो सावधान ! अल्पवयीनकडून गुन्हा झाल्यास पालकांवर गुन्हा दाखल होणार !
Rohit Pawar Tweet : रोहित पवार यांचा ट्विट, म्हातारा पैलवान कुस्ती खेळताना चा व्हिडिओ केला ट्विट