Rohit Pawar Tweet : रोहित पवार यांचा ट्विट, म्हातारा पैलवान कुस्ती खेळताना चा व्हिडिओ केला ट्विट
•दोन्ही राष्ट्रवादीच्या गटामध्ये वयाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप केले जात आहे
पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबामध्ये देखील दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शरद पवार तर दुसरीकडे अजित पवार अशी स्थिती पवार कुटुंबाची झाली आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्यातच अजित पवार यांनी शरद पवार यांचे वय झाले आहे, त्यांनी आता भजन, कीर्तन करावे अशी टीका केली होती. अजित पवार यांच्या टीकेला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Rohit Pawar Tweet
आमदार रोहित पवार यांचा ट्विट
वय नाही तर जिद्द महत्वाची असते, हेच व्हॉटसअपवर आलेल्या कुस्तीच्या या व्हिडिओतून दिसतं… म्हणूनच वयाकडं बोट दाखवून ‘तुम्ही थांबत का नाही?’ असा प्रश्न विचारायचा नसतो.. Rohit Pawar Tweet
पैलवान कधीच म्हातारा होत नसतो….राहिला प्रश्न भजनाचा, तर भजन हा व्यक्तिगत भक्तीचा विषय असल्याने कोणत्याही वयात भजन करता येतं. त्यामुळं भजनाला वयाशी जोडणं, हेही चुकीचं आहे.. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी कोवळ्या वयात भक्ती आणि अध्यात्माचा पाया रचला हे कळणंही महत्त्वाचं असतं आणि ते कळायला अध्यात्मावर भक्ती आणि आस्था लागते.. Rohit Pawar Tweet
नेमके काय म्हणाले आमदार रोहित पवार
या संबंधी एक व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला आहे. त्याबरोच त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकाही केली आहे. ते म्हणाले की, ‘वय नाही तर जिद्द महत्वाची असते, हेच व्हॉटसअपवर आलेल्या कुस्तीच्या या व्हिडिओतून दिसतं… म्हणूनच वयाकडं बोट दाखवून ‘तुम्ही थांबत का नाही?’ असा प्रश्न विचारायचा नसतो.. पैलवान कधीच म्हातारा होत नसतो.. राहिला प्रश्न भजनाचा, तर भजन हा व्यक्तिगत भक्तीचा विषय असल्याने कोणत्याही वयात भजन करता येतं. त्यामुळं भजनाला वयाशी जोडणं, हेही चुकीचं आहे.. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी कोवळ्या वयात भक्ती आणि अध्यात्माचा पाया रचला हे कळणंही महत्त्वाचं असतं आणि ते कळायला अध्यात्मावर भक्ती आणि आस्था लागते.’ Rohit Pawar Tweet