All Out Operation : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोबिंग ऑपरेशन
•19 ठिकाणी नाकाबंदी, 397 संशयित वाहनांची तपासणी
भाईंदर :- लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 16 मार्च 2024 पासुन आचार संहिता लागू करण्यात आली असुन त्याअनुषंगाने मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत परिमंडळ-1 अधिनस्त काशिमीरा, काशिगांव, मिरारोड, नयानगर, नवघर, भाईंदर, उत्तन पोलीस ठाण्यात (19 मार्च ) रोजी ऑल आउट, कोबिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबवण्यात आली होती.
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय व परिमंडळ-1 अधिनस्त विभागीय सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला.
ऑल आउट कोबिंग ऑपरेशन दरम्यान 5 वॉरट मधील व मुख्य/फरारी 2 आरोपीत यांना अटक करण्यात आले, एन.डी.पी.एस. कायदयान्वये 11 केसेस करण्यात आल्या, 17 इसमावर सी.आर.पी.सी. 107 प्रमाणे प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात आली, दारुबंदी कायद्यान्वये 06 गुन्हे दाखल करण्यात आले, कोप्ता अंतर्गत 15 एन.सी. दाखल केल्या, 17 हिस्ट्रीशिटर तपासले, 08 विदेशी नागरीक तपासले, 07 तडीपार इसमाना तपासले, 54 हॉटेल व लॉजेस तपासले. 19 ठिकाणी नाकाबंदीचे लावण्यात आली होती. सदर नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. नाकाबंदीच्या वेळी 397 संशयीत वाहने तपासण्यात आली असून मोटार वाहन कायदया अन्वये 149 केसेस करण्यात आल्या आहेत.