Pune Crime News | बिबवेवाडी : मोक्कातील फरार आरोपी पिस्टलसह जेरबंद
Pune Crime News | बिबवेवाडी पोलिसांची दमदार कामगिरी
पुणे, दि. २१ मार्च, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News
पूर्ववैमनस्यातून प्रेम उर्फ यश कदम याच्यावर धारधार हत्याराने प्राणघातक हल्ला करणारा व मोक्का गुन्ह्यातील मुख्य आरोपी सौरभ शिंदे याला पिस्टलसह पकडण्यात आले आहे. बिबवेवाडी पोलिसांनी वपोनि विनय पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. Pune Crime News
दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रेम ऊर्फ यश कदम हा बाहेरून जेवण करून घरी येत असताना आरोपी सौरभ शिंदे, तेजस जगताप, चंदर राठोड, अनिकेत काटकर व पंकज दिवेकर रा. अप्पर बिबवेवाडी पुणे यांनी त्याला धरून कुसाळकर किराणा मालाचे दुकानाचे गल्लीतून आतील मंदिराचे मोकळ्या मैदानात अप्पर बिबवेवाडी येथे घेवून जावून त्याचेवर लोखंडी रॉड व लोखंडी हत्याराने जुन्या भांडणारचे कारणावरून दोन्ही हाताचे मनगटावर, दोन्ही पायाचे गुडघ्यावर व नडग्यांवर, पोटावर व डोक्यात वार करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २३९/२०२३, भा.दं.वि. कलम. ३०७,३२३,१४३, १४७,१४८, १४९, महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) सह १३५ गुन्हा दाखल असून दाखल गुन्हा नमुद आरोपीनी संघटीतपणे केलेला असल्याने दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३ (४) प्रमाणे कलमवाट करण्यात आली आहे. दाखल गुन्हयामध्ये एकूण तेजस जगताप, अनिकेत काटकर व पंकज दिवेकर यांना अटक करण्यात आलेली आहे.
गुन्हा दाखल झालेपासून गुन्हयातील मुख्य सुत्रधार व टोळीप्रमुख सौरभ शरद शिंदे हा फरार होता. गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर व विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस ठाणे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि प्रविण काळुखे, तपास पथकातील स्टाफ आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अमंलदार शिवाजी येवले यांना सौरभ शिंदे बाबत गुप्त माहिती मिळाली होती. बातमीवरून आरोपी नामे सौरभ शरद शिंदे, वय २३ वर्षे रा. पुनम गार्डनचे मागे, रोहिडेश्वर बिल्डींग १९/ए, बिबवेवाडी पुणे. यास सापळा रचून शिताफीने पकडण्यात आले. आरोपीची अंग झडती घेता एक गावठी बनावटीचे पिस्टल कि. रू २५,०००/-चे हस्तगत करण्यात आला. याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.६५/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी Pune Police पोलीस उप आयुक्त आर राजा DCP R Raja, परिमंडळ ५ पुणे शहर व सहा. पोलीस आयुक्त गणेश इंगळे ACP Ganesh Ingale, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर Sr.Pi. Vinay Patankar, तपासपथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस उप निरीक्षक बालू शिरसट, पोलीस हवालदार, शामराव लोहोमकर, संतोष जाधव, शिवाजी येवले, आशिष गायकवाड, विशाल जाधव, प्रणव पाटील, अभिषेक धुमाळ, ज्योतिष काळे, यांनी केली आहे.