Uncategorized

Pune Crime News | हांडेवाडी परिसरात घरफोडी करणारे चोरटे जेरबंद : वानवडी तपास पथकाची कामगिरी

पुणे, दि. २ एप्रिल, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News

हांडेवाडी रोड येथील गजबजलेल्या ईशा अॅम्पायर सोसायटीत पहाटेच्या सुमारास अँपल मोबाईल, लॅपटॉप व सॅमसंग मोबाइलवर डल्ला मारणाऱ्या सराईत चोरट्यांना वानवडी तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. Pune Crime News

या कारवाईत सराईत चोरटा १) अल्ताफ ऊर्फ एम सी स्टँड हमीद शेख, वय २० वर्षे, रा. ग.नं. १६, सय्यदनगर, हडपसर, पुणे, २) आलीम साहेब पटेल, वय १९ वर्षे, रा.ग.नं.१२, सय्यदनगर, हडपसर, पुणे यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. १९ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास ईशा अॅम्पायर सोसायटी, चिंतामणीनगर येथील फ्लॅटमधून अँपल मोबाईल, लॅपटॉप व सॅमसंग मोबाइल चोरीस गेला होता. सदर गुन्ह्याचा तपास करण्याबाबत वपोनि संजय पतंगे Sr.Pi. Sanjay Patange यांनी तपास पथकाचे उपनि संतोष सोनवणे PSI Santosh Sonvane यांना सूचना दिल्या होत्या.

तपास पथकाकडून आरोपीबाबत तपास करण्यात येत असताना सदर घरफोडी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार १) अल्ताफ ऊर्फ एम सी स्टँड हमीद शेख, वय २० वर्षे, रा. ग.नं. १६, सय्यदनगर, हडपसर, पुणे, २) आलीम साहेब पटेल, वय १९ वर्षे, रा.ग.नं.१२, सय्यदनगर, हडपसर, पुणे यांनी केली असल्याची माहिती मिळाली. आरोपींची माहिती मिळताच वपोनि संजय पतंगे यांच्या आदेशानव्ये तपास पथकाचे उपनि संतोष सोनवणे व पथकाने आरोपीला ताब्यात घेतले.

पोलीस तपासात आरोपींकडून गुन्हयात चोरी गेलेला लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, एक अॅपल कंपनीचा मोबाईल व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण ८५,०००/- रु. कि. मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कामगिरी Pune Police पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परि.-५. पुणे शहर आर राजा, व सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पतंगे, पोलीस निरिक्षक गुन्हे राजेंद्र करणकोट व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, हरिदास कदम, अमजद पठाण, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, यतिन भोसले, अमोल गायकवाड, गोपाल मदने यांनी केली आहे.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार हरीदास कदम, वानवडी पोलीस स्टेशन करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0