ठाणेक्राईम न्यूज

Badlapur Crime News : वाहन लुटणाऱ्या आरोपीला केले अटक, आरोपीने वाहन चालकावर चाकूने गेले वार

Badlapur Crime News People Get Thug On Badlapur Highway Road By Showing Knife : महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना अडवुन वाहन चालकांवर चाकुने वार करून गंभीर जखमी करून लुटणाऱ्या आरोपीना शिताफीने अटक

बदलापूर :- काटाई-बदलापुर हायवे रोड, म्हाडा सर्कल, आनंदनगर, एमआयडीसी, अंबरनाथ पुर्व येथे फिर्यादी नटवर रामस्वरूप सिंग, (30 वर्ष) हे त्यांचे ताब्यातील ट्रक घेवुन बदलापुरच्या दिशेने जात असतांना तिन अनोळखी आरोपी यांनी फिर्यादीचे ट्रकला त्यांची मोटार सायकल आडवी लावुन ” आमच्या गाडीला कट का मारला ?” या कारणावरून फिर्यादी यांचेवर चाकुने वार करून फिर्यादी यांचेकडील सात हजार रू. रोख रक्कम, पाकीट, आधारकार्ड, गाडीची चावी बळजबरीने चोरून घेवुन गेले म्हणुन फिर्यादी यांचे तक्रारीवरून गुन्हा भा.द.वि. कलम 397 प्रमाणे 11 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार नमुद गुन्हयाचा सखोल तपास सुरू करण्यात आला. Badlapur Crime News

महामार्गावर वाहन चालकांचे वाहने अडवुन त्यांचेवर चाकुने वार करून गंभीर जखमी करून पळुन गेलेल्या अनोळखी आरोपी यांचा शोध घेणेकामी तिन वेगवेगळे पथक तयार करून आरोपीत यांचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आले. गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेख व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळापासुन आनंदनगर एमआयडीसी, पालेगाव नाका, नेवाळीनाका, नांदीवली तेथुन परत नेवाळीनाका, पालेगाव, गायकवाडपाडा, भाटीया चौक, नेताजी चौक, विनस चौक, महादेव मंदीर आशाळेपाडा, उल्हासनगर-4 पर्यंत सलग 08 दिवस प्रयत्न करून एकुण 38 ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपीत आशाळेपाडा परीसरात गेल्याचे निष्पन्न झाले. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व गुप्त बातमीदारामार्फत आरोपी 1) तुषार दत्ता कडु, 2) रोहन वाघमारे, 3) गणेश बिरारे, सर्व (राह. आशेळेपाडा, उल्हासनगर-4) हे असल्याचे निष्पन्न करण्यात आले. नमुद आरोपीत यांचेपैकी एक रोहन वाघमारे हा विधीसंघर्षीत बालक असल्याने त्यास 23 मार्च रोजी ताब्यात घेवुन बाल न्यायालय, भिवंडी येथे हजर करण्यात आले आहे. तसेच दुसरा आरोपी तुषार कडु यास नमुद गुन्हयात 26 मार्च रोजी अटक करण्यात आली असुन त्याची दिनांक 02 एप्रिल रोजी पोलीस कस्टडी मंजुर आहे. आरोपीत यांनी गुन्हयात वापरलेली 25 हजार रू. किंमतीची होंडा मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच उर्वरीत पाहीजे आरोपी गणेश बिरारी याचा शोध सुरू आहे. Badlapur Crime News

पोलीस पथक

पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 4, उल्हासनगर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबरनाथ विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, पोलीस निरीक्षक प्रदिप सालेकर, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. शेख, पोलीस हवालदार सैंदाणे, पादीर, वळवी, साळुंके, पोलीस नाईक देवरे, पोलीस शिपाई राजगे, गडगे यांनी पार पाडून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. Badlapur Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0