Pune Crime News | नांदेड सिटी परिसरातून गावठी पिस्तूलसह तरुणास बेड्या
nanded city police station

नांदेड सिटी पोलिसांकडून गुन्हेगारांवर जरब
पुणे, दि, ९ फेब्रुवारी, महाराष्ट्र मिरर (मुबारक जिनेरी)
Pune Crime News | नांदेड सिटी पोलिसांकडून एका कारवाईत धायरी शेवट बस स्टॉप स्मशानभूमी येथे थांबलेल्या तरुणाकडून गावठी पिस्तूल व जिवंत राउंड जप्त करण्यात आला आहे. Nanded City वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस व तपास पथकाकडून सदर कामगिरी करण्यात आली आहे. Pune Crime News
आरोपी विशाल तानाजी कधीरे, वय 22, रा. फ्लॅट नंबर 01, मुक्तांगण बिल्डिंग काळुबाई मंदिर मागे धायरी पुणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Pune Crime News

Pune | नांदेड सिटी पोलीस तपास पथकातील पोलीस शिपाई 8606 पुरुषोत्तम गुनला व पोलीस शिपाई 8897 योगेश झेंडे यांचे गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की, एक संशयित इसम धायरी गाव येथील शेवटच्या बस स्टॉप जवळ स्मशानभूमीच्या आत मध्ये एक पिस्टल घेऊन थांबला आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस व तपास पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी कारवाई करत आरोपी विशाल कधीरे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आला. Pune Crime News
याबाबत नांदेडीसीटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 02/ 2025 भारतीय हत्यार कायदा 3 ( 25), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.