Bhiwandi चोरी ; महिलेच्या मंगळसूत्राची चोरी
Bhiwandi Crime News Thief stole Jewelary from haldi ceremoney : हळदी समारंभाला गेलेल्या महिलेच्या मंगळसूत्राची चोरी, लबाडीने चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र गाडीच्या डिकीतून केले लंपास
भिवंडी :- शहरांमध्ये सातत्याने चोरीची घटना वाढत असल्याचे दिसत आहे. एका महिलेसोबत चोरीची घटना घडल्याची समोर आली आहे.गुंदवली गाव येथे हळदी समारंभाला गेलेल्या महिलेच्या (21 वर्ष) गाडीच्या डिकीतून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची किंमत तीन लाख 60 हजार रुपये एवढी आहे. Bhiwandi Crime News
रविवारी (31 मार्च) रोजी रात्री 9.30 ते 12.30 वा. चे दरम्यान, राईस मिलचे समोर, गुंदवली गाव, भिवंडी येथे, फिर्यादी महिला, (21 वर्ष) रा.सावंदेगाव, भिवंडी हया हळदी सभारंभाकरीता गेल्या असता त्यांनी त्यांची मोटार सायकल च्या डिकीमध्ये ठेवलेले एकुण 3 लाख 60 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र कोणीतरी अज्ञात चोरटयाने लबाडीने चोरी करून नेले आहे. प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द भा.द.वि.कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी.डी.पाटील हे करीत आहे. Bhiwandi Crime News