मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Youtuber Jasbir Singh : पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी करणारा युट्यूबर जेरबंद!

•'जान महल' युट्यूब चॅनेल चालवणारा जसबीर सिंह रूपनगरमधून अटक

V
Vivek

1 मिनिट वाचन

Youtuber Jasbir Singh : पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी करणारा युट्यूबर जेरबंद!

•'जान महल' युट्यूब चॅनेल चालवणारा जसबीर सिंह रूपनगरमधून अटक

ANI :- भारतामध्ये पाकिस्तानी गुप्तहेरगिरीशी संबंधित मोठा खुलासा समोर आला असून, पंजाब पोलिसांनी रूपनगर येथून जसबीर सिंह नावाच्या एका युट्यूबरला अटक केली आहे. जसबीर सिंह 'जान महल' नावाचा युट्यूब चॅनेल चालवत होता आणि त्याचे संबंध आधीच अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्रा या युट्यूबरसह, पाकिस्तानच्या निष्कासित उच्चायोग अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश याच्याशीही असल्याचे उघड झाले आहे.

पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली. मोहाली येथील स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेलने (SSOC) ही कारवाई केली असून जसबीरचा संबंध PIO शाकिर उर्फ जट्ट रंधावा या दहशतवादी समर्थक गुप्तहेर नेटवर्कशी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जसबीरने 2020, 2021 आणि 2024 मध्ये तीन वेळा पाकिस्तानमध्ये प्रवास केला होता. त्याने दिल्लीत झालेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता, जिथे त्याची भेट पाक लष्करातील अधिकाऱ्यांशी आणि इतर पाकिस्तानी व्ह्लॉगर्सशी झाली होती. पोलिसांनी त्याचे इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त केले असून, त्यात पाकिस्तानशी संबंधित अनेक संपर्क क्रमांक सापडले आहेत.

दरम्यान, ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर जसबीरने आपल्या संवादाचे आणि संबंधाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी मोहालीच्या एसएसओसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण नेटवर्कचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

हेही वाचा: Mumbai Crime News : महिला वेशात चोर! मालाड पोलिसांच्या जबरदस्त तपासात 41 लाखांचा ऐवज जप्त, मुंबईतील चोरीची गुपिते उलगडली

शेअर करा