मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Yogesh Kadam : मंत्री योगेश कदमांचं मंत्री नितेश राणेंना प्रत्युत्तर ; "माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही"

Yogesh Kadam on Nitesh Rane : "माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Yogesh Kadam : मंत्री योगेश कदमांचं मंत्री नितेश राणेंना प्रत्युत्तर ; "माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही"

Yogesh Kadam on  Nitesh Rane : "माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं.

मुंबई :- दापोलीमधील सभेत बोलताना नितेश राणे Nitesh Rane यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम Yogesh Kadam यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आज मंत्री योगेश कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री नितेश राणे माझे मित्र, पण माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं. मतदारसंघात शांतत कशी राखावी हे मला चांगलं समजतं असे चोख प्रत्युत्तर मंत्री योगेश कदम यांनी नितेश राणे यांना दिले.

नेमकं काय म्हणाले होते मंत्री नितेश राणे?

इथून पुढे तुमच्याकडे जर कोणी दगड फेकला तर त्या प्रत्येक दगडाचा हिशोब चुकता होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो असे नितेश राणे दापोलीमध्ये म्हणाले होते. काही चिंता करु नका, आज राज्यामध्ये हिंदुत्वादी विचारांचे सरकार आहे. गृहखाते आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. FIR मध्ये जर नाव आले नसेल, वाचवणारे कोणी असेल ते आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा मोठे नाहीत. संबंधीत खात्यातील काही लोकांनी लक्षात घ्यावं, अशी नाव न घेता मंत्री नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली होती.

मी जन्मापासून शिवसेनेत आहे, बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाचं बाळकडू पाजलंय. मी कधीही भगवा खाली ठेवला नाही, याचा अर्थ नितेश राणे यांनी समजून घ्यावं, असा टोला देखील योगेश कदम यांनी राणेंना लगावला. आमच्या हाहात आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही राहिल असे योगेश कदम म्हणाले. एका शिवसैनिकाला हिंदुत्व शिकवू नये असेही योगेश कदम म्हणाले. माझा मतदारसंघ शांत कसा ठेवायचा हे मला चांगल माहित आहे. त्यांनी कुठे सभा घ्यावी? काय घ्यावी? हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. हिंदू धर्माचा प्रचार ते करत असतील तर मला आनंद आहे. पण माझ्यावर जर ते टीका करत असतील तर माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही असा टोला योगेश कदम यांनी लगावला.

शेअर करा