मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

West Bengal Election : 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला; 4 मे ला 'निकाल' तर बंगालमध्ये दोन टप्प्यांत रणसंग्राम

West Bengal Election Latest News : निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर; आचारसंहिता लागू होताच राजकीय वातावरण तापले

V
Vivek

1 मिनिट वाचन

West Bengal Election : 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला; 4 मे ला 'निकाल' तर बंगालमध्ये दोन टप्प्यांत रणसंग्राम

West Bengal Election Latest News : निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर; आचारसंहिता लागू होताच राजकीय वातावरण तापले

ANI :- देशातील राजकीय रणधुमाळीला आता अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या चार राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. या घोषणेमुळे या राज्यांमध्ये तत्काळ 'आचारसंहिता' लागू झाली असून, सर्व ठिकाणची मतमोजणी 4 मे 2026 रोजी पार पडणार आहे.

निवडणुकीचे टप्पे आणि मतदानाची तारीख

यावेळी निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील टप्प्यांमध्ये मोठी कपात केली आहे. गेल्या वेळी आठ टप्प्यांत झालेल्या निवडणुका यंदा केवळ दोन टप्प्यांत (23 आणि 29 एप्रिल) घेतल्या जाणार आहेत. आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल, तर तमिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात सर्व जागांसाठी कौल दिला जाईल.

निवडणूक आयोगाचा कडक इशारा

निवडणूक प्रक्रियेत हिंसाचार, पैशांचा गैरवापर आणि कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना थारा दिला जाणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. सुमारे 17.4 कोटी मतदार या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणार असून आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही आयोगाने दिला आहे. मतदानाच्या सुलभतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी सुमारे 25 लाख निवडणूक कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे.

काँग्रेसची 'प्रचार संहिता' म्हणत टीका

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांना धार चढली आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयोगाचा उल्लेख 'मोदींची प्रचार संहिता' (MCC) असा केला. निवडणूक आयोग केवळ सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असून ही संस्था लोकशाही मूल्यांऐवजी भीती आणि धमक्यांचे वातावरण निर्माण करत असल्याची बोचरी टीका काँग्रेसने केली आहे.

उप निवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर

पाच राज्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसोबतच महाराष्ट्र आणि गुजरातसह इतर राज्यांमधील काही रिक्त जागांसाठीच्या पोटनिवडणुकाही जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुका 23 एप्रिल रोजी होणार असून त्यांचे निकालही 4 मे रोजीच जाहीर होतील. यामुळे आता संपूर्ण देशाचे लक्ष मे महिन्यातील या निकालांकडे लागले आहे.

*

शेअर करा