Pimpri Crime : वाल्हेकरवाडीत महिलेला जातीवाचक शिवीगाळ: सहा जणांवर गुन्हा
Pimpri Crime :पिंपरी: घराच्या मालकीच्या वादातून ३० वर्षीय महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले.
1 मिनिट वाचन

Pimpri Crime : मालमत्ता विक्रीवरून शेजाऱ्यांशी वाद
Pimpri Crime :पिंपरी: घराच्या मालकीच्या वादातून ३० वर्षीय महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले. तसेच धक्काबुक्की करून दमदाटी केली. वाल्हेकरवाडी येथे ५ जून २०२६ रोजी ही घटना घडली. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने १९ ऑगस्ट रोजी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओंकार चिंचवडे, आशिष चिंचवडे, प्रतीक चिंचवडे, बळीराम चिंचवडे आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वाल्हेकरवाडी परिसरात पाच वर्षांपूर्वी घरासह जागा खरेदी केली होती. या मिळकतीबाबत ताबा साठेकरार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संबंधित घर भाड्याने दिले होते. पीडित महिला मिळकतीची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी त्यांच्या घराशेजारील भिंतीवर एक फलक लावला होता.https://maharashtramirror.com/ pimpri crime
संबंधित मालमत्ता वादग्रस्त असून इच्छुक खरेदीदार अथवा भाडेकरूंनी या मालमत्तेच्या व्यवहारात पडू नये, अशा आशयाचा मजकूर फलकावर होता. याबाबत पीडित महिलेने आरोपींकडे विचारणा केली. त्यावेळी संशयितांनी त्यांना जातीचा उल्लेख करून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. घर विकण्यावरून दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.आरोपींच्या त्रासाला कंटाळून संबंधित घर विकण्याचा निर्णय घेतला असता घर पाहण्यासाठी येणाऱ्या मध्यस्थांना चुकीची माहिती देऊन परत पाठविले जात असल्याचाही आरोप फिर्यादीतून केला आहे.




