मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : एटीएम चोरीच्या प्रयत्नातील संशयिताला अटक

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : वाघोलीतील लोहगाव रस्त्यावरील पीएमपीएमएल चार्जिंग स्टेशनजवळ एटीएम मशीन चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट सात आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने एका संशयिताला अटक केली.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

एटीएम चोरीच्या प्रयत्नातील संशयिताला अटक वाघोलीतील चार्जिंग स्टेशनजवळील प्रकार; पाच लाखांचा टेम्पो आणि मोबाईल जप्त
एटीएम चोरीच्या प्रयत्नातील संशयिताला अटक वाघोलीतील चार्जिंग स्टेशनजवळील प्रकार; पाच लाखांचा टेम्पो आणि मोबाईल जप्त

Pune News : वाघोलीतील चार्जिंग स्टेशनजवळील प्रकार; पाच लाखांचा टेम्पो आणि मोबाईल जप्त

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : वाघोलीतील लोहगाव रस्त्यावरील पीएमपीएमएल चार्जिंग स्टेशनजवळ एटीएम मशीन चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट सात आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने एका संशयिताला अटक केली. गणेश अशोक पवार (वय २३, रा. एस. टी. कॉलनी, वाघोली) असे त्याचे नाव आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी टेम्पो घेऊन इंडिया एटीएम मशीनजवळ पोहोचून ते चोरण्याचा प्रयत्न केला. मशीन जड असल्याने त्यांना ते उचलता आले नाही. त्यानंतर ते टेम्पोसह निघून गेले. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ६२, ३२९(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. https://maharashtramirror.com/ Pune News

तपासादरम्यान सीसीटीव्ही चित्रण आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने पवारला वाघोलीतील एस. टी. कॉलनी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेला पाच लाख रुपये किमतीचा टाटा एस टेम्पो आणि पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. एटीएम चोरीच्या प्रयत्नात त्याच्यासोबत आणखी कोण होते, याचा तपास पोलीस करीत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागवान, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, युनिट ७ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ७ चे पोलीस अंमलदार सारंग दळे, प्रशांत कापुरे, विनायक साळवे, निलेश साळवे, सुहास तांबेकर, तसेच दरोडा व वाहनचोरीविरोधी पथक पुणे शहरचे पो. अं. प्रफुल्ल मोरे यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा