मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Virar Crime News : ‘मी पोलीस आहे!’ म्हणत धमकावणारा तोतया गजाआड! विरार पोलिसांकडून 'ब्लॅकमेल' करणाऱ्या आरोपीला नालासोपारातून अटक

•अश्लील वर्तनाची धमकी देत नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार; फसवणुकीचे तीन गुन्हे उघडकीस

V
Vivek

2 मिनिट वाचन

Virar Crime News : ‘मी पोलीस आहे!’ म्हणत धमकावणारा तोतया गजाआड! विरार पोलिसांकडून 'ब्लॅकमेल' करणाऱ्या आरोपीला नालासोपारातून अटक

•अश्लील वर्तनाची धमकी देत नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार; फसवणुकीचे तीन गुन्हे उघडकीस

विरार :- रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांना पोलिसाची बतावणी करून धमकावणे आणि अश्लील वर्तनाची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळणे अशा गंभीर फसवणुकीच्या गुन्ह्यात सामील असलेल्या एका आरोपीला विरार पोलिसांनी जेरबंद केले आहे. विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कौशल्यपूर्ण कामगिरी करत आरोपीला नालासोपारा परिसरातून अटक केली आहे.

विरार पूर्व येथील फुलपाडा आर. जे. नाका परिसरात 12 सप्टेंबर 2025 रोजी ही घटना घडली होती. तक्रारदार ललित शिवलाल माळी हे त्यांच्या मैत्रिणीसोबत रस्त्याने पायी जात असताना, अंदाजे 30 ते 35 वयोगटातील एका अनोळखी इसमाने त्यांना अडवले. त्याने स्वतःला पोलीस भासवत, "सोबत कोण आहे, अश्लील वर्तन का केले? मी रेकॉर्डिंग केलेली आहे," अशी धमकी दिली. फिर्यादी घाबरल्याने आरोपीने त्यांच्याकडून पैसे घेऊन फसवणूक केली. या तक्रारीवरून 16 सप्टेंबर 2025 रोजी विरार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता-2023 च्या कलम 318(4), 204 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता.

शोध घेऊन आरोपीला अटक

या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत, वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांनी तातडीने तपास सुरू केला. बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून, पोलिसांनी या अनोळखी आरोपीचा शोध घेतला. तपासात ज्ञानेश्वर पाटील नावाच्या इसमाने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याला मोरेगाव, नालासोपारा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून, पोलिसांनी फसवणूक केलेली रक्कमही हस्तगत केली आहे.या आरोपीच्या अटकेमुळे विरार पोलीस ठाण्यातील फसवणुकीचे एकूण तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

आवाहन

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे कोणी 'पोलिसाचे सोंग' घेऊन फसवणूक केली असल्यास, त्यांनी तात्काळ विरार पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुहास बावचे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ-3) आणि बजरंग देसाई (सहायक पोलीस आयुक्त, विरार) यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल. एम. तुरे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने पार पाडली.

हेही वाचा: Vijay Wadettiwar : 4 लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त! पूरस्थितीवरून काँग्रेस आक्रमक; 'ओला दुष्काळ' जाहीर करून तातडीने विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी

शेअर करा