मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Virar Crime News : चोरीला गेलेले 35 मोबाईल मूळ मालकांना केले परत; तुळींज पोलिसांची कामगिरी

• प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ; 35 मोबाईल नागरिकांना परत मिळवून देण्यात तुळींज पोलिसांना यश आलं आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Virar Crime News : चोरीला गेलेले 35 मोबाईल मूळ मालकांना केले परत; तुळींज पोलिसांची कामगिरी

•प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ; 35 मोबाईल नागरिकांना परत मिळवून देण्यात तुळींज पोलिसांना यश आलं आहे.

विरार :- मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून मोबाईल चोरी होणे, हरवणे, तसंच गहाळ होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळं पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी विशेष मोहीम राबवून चोरीच्या फोनचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार शहरात चोरी झालेले तब्बल 5 लाख रुपयांचे मोबाईल तुळींज पोलिसांनी नागरिकांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त परत मिळवून दिले आहेत.

तुळींज पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. तर हरवलेले मोबाईल हे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून ट्रेस झाले होते.हे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आणि नागरिकांना परत दिले. त्यामुळं आपला मोबाईल परत मिळाल्याचा आनंद मोबाईल धारकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. यावेळी मोबाईल मालकांनी पोलिसांचे आभार मानले.

दैनंदिन व्यवहारात संपर्क करण्यासाठी, करमणुकीसाठी, फोटो काढण्यासाठी मोबाईलचा अविरतपणे वापर होत असतो. मोबाईलबाबत प्रत्येक व्यक्ती खूप संवेदनशील आहे. मोबाईल हरवला, चोरी झाला अथवा गहाळ झाल्यास संबधित व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये मदती करता येते. यासाठी विशेष मोहीम राबवत आम्ही 5 लाख किंमतीचे तब्बल 35 मोबाईल हस्तगत केले आहेत. त्याचबरोबर मोबाईल चोरीला जाणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी देखील केलं आहे.

पोलीस पथक
पौर्णिमा चौगुले श्रींगी पोलीस उप आयुक्त सो, परीमंडळ-2 वसई, उमेश माने-पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, तुळींज पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस निरीक्षक आनंद पेडणेकर, बाळासाहेब बनकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल पवार, पोलीस उपनिरीक्षक राहुल फड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार आनंद मोरे, उमेश वरठा, पांडुरंग केंद्रे,आशपाक जमादार, राज जाधव, पोलीस शिपाई छपरीबन, राहुल कदम, शाशिकांत पोटे तसेच पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ 2 नेमणुकीतील पोलीस हवालदार बागुल, पोलीस शिपाई अमोल बड़े यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

हेही वाचा: Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे पोलिसांच्या ताब्यात

शेअर करा