मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा "लाडका मंत्री"योजनेचा आणखी एक लाभार्थी ; राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे ट्विट

•शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप, 500 कोटीचा भूखंड कवडीमोलाच्या भावात दिलं असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vijay Wadettiwar On Pune Accident Case

•शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप, 500 कोटीचा भूखंड कवडीमोलाच्या भावात दिलं असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

मुंबई :- राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडवणारे ट्विट‌ करत शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मुख्यमंत्र्यांचा "लाडका मंत्री" योजनेचे आणखी एक लाभार्थी समोर आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केले आहे. नवी मुंबईतील एक भूखंड राज्याचे मंत्री संजय राठोड यांना कवडीमोल भावात दिल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. या संदर्भातील ट्विट करत भूखंडमध्ये गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे.

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
मुख्यमंत्र्यांचा ‘लाडका मंत्री‘ असतो तेव्हा काय काय होऊ शकते बघा..

तब्बल ५०० कोटी रुपयांचा भूखंड अवघ्या एक रुपये प्रती चौरस मीटरच्या किंमतीत मिळू शकतो. दुसऱ्यांच्या जमिनी फुकटात हडपू शकतात.

मुख्यमंत्र्यांच्या "लाडका मंत्री" योजनेचा आणखी एक लाभार्थी महाराष्ट्रापुढे आला आहे.

1 नोव्हेंबर 2023 रोजी, राज्याच्या नगरविकास विभागाने एक भूखंड श्री.संत डॉ.रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्टला हस्तांतरित करण्यात आल्याचा उल्लेख करणारा शासन निर्णय प्रसिद्ध झाला

मात्र मंत्रिमंडळाची कोणतीही मान्यता न घेता हा निर्णय झाल्याचे आता समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांचे लाडके मित्र मंत्री संजय राठोड यांच्या दबावात बेलापूर, नवी मुंबई येथील 5600 चौ.मी. भूखंड श्री.संत डॉ. रामराव महाराज चॅरिटेबल या ट्रस्टच्या नावाने वाटप करण्यात आला.

मतांसाठी लाडक्या बहिणीला 1500/- रुपये, आणि लाडक्या मंत्र्याला 500 कोटींचा भूखंड कवडीमोल भावात. महाराष्ट्राची लूट जिथे मिळेल तिथे कशी सुरू आहे बघा!

हेही वाचा: Mumbai Crime News : ७७ वाहनांच्या मुळ मालकाचा शोधडायघर पोलिस ठाण्याची कामगिरी

शेअर करा