उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा; आरोग्य कारणास्तव पदत्याग
Jagdeep Dhankhar Resigns As Vice President : राष्ट्रपतींना पत्राद्वारे माहिती; संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घेतला मोठा निर्णय
1 मिनिट वाचन

Jagdeep Dhankhar Resigns As Vice President : राष्ट्रपतींना पत्राद्वारे माहिती; संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घेतला मोठा निर्णय
ANI :- भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, या अनपेक्षित निर्णयामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आरोग्य कारणे आणि वैद्यकीय सल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून तात्काळ प्रभावाने राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे.धनखड यांनी आपल्या पत्रात लिहिले, Jagdeep Dhankhar Resigns As Vice President "आरोग्याला प्राधान्य देत आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा संविधानाच्या कलम 67(अ) अंतर्गत देत आहे."
मोदी सरकारच्या सहकार्याबद्दल आभार, "लोकशाहीतील अनुभव अमूल्य" – धनखड यांची भावनिक प्रतिक्रिया
राजीनाम्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळ, राष्ट्रपती आणि संसद सदस्यांचे आभार मानले आहेत. आपल्या कार्यकाळातील अनुभव, सन्मान आणि लोकशाही मूल्यांची आठवण त्यांनी भावनिक शब्दांत मांडली.
"भारतीय लोकशाहीची सेवा करणे हे माझ्यासाठी अत्युच्च सन्मान होते. उपराष्ट्रपती म्हणून मला मिळालेले प्रेम, विश्वास आणि सन्मान मी कधीही विसरणार नाही. भारताच्या आर्थिक प्रगतीचा आणि परिवर्तनाच्या टप्प्याचा मी साक्षीदार ठरलो, हे माझ्यासाठी भाग्य होते," असे ते म्हणाले.
मार्च महिन्यात धनखड यांना हृदयाशी संबंधित संसर्गामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत असली तरी वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनी राजकीय जबाबदारीपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.
दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांचा राजीनामा येणे ही एक मोठी राजकीय घडामोड ठरली आहे. त्यांच्या उत्तराधिकारीच्या निवडीसंदर्भात आता चर्चांना वेग येण्याची शक्यता आहे.




