मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vasai Bribe News : महावितरणचा ‘खिसेकाटू’ अधिकारी अखेर सापळ्यात! 30 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

•"2 लाखांचं थकीत बिल 60 हजारात उरकतो, पण तुमचं मला 30 हजार द्यायचं!" – उपव्यवस्थापकाचा सौदाबाजार उघड

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Anti Corruption Bureau News

•"2 लाखांचं थकीत बिल 60 हजारात उरकतो, पण तुमचं मला 30 हजार द्यायचं!" – उपव्यवस्थापकाचा सौदाबाजार उघड

वसई, पालघर | पालघर जिल्ह्यातील वसई पूर्व येथे कार्यरत असलेल्या महावितरणच्या उपव्यवस्थापकाचा भ्रष्टाचाराचा बुरखा अखेर फाडला गेला. कल्पेश जयवंत पाटील (वय 53), पद – उपव्यवस्थापक वित्त व लेखा) यांनी 30 हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात अडकले.

प्रकरण धक्कादायक आहे. तक्रारदार यांच्या कुटुंबाच्या नावावर 2010 पासून बंद असलेले विजेचे मीटर होते. या मीटरवर थकबाकी दाखवण्यात आली होती संपूर्ण 2 लाख 6 हजार 920 रुपये. परंतु सदर रक्कमेतून "डील" करून, केवळ 60 हजार रुपये भरून बिल मिटवतो," अशी लालसेची ऑफर उपव्यवस्थापक पाटील यांनी दिली. मात्र त्या बदल्यात त्यांनी स्वतःसाठी 30 हजारांची लाच मागितली.

तक्रारदाराने ही माहिती 9 जून 2028 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. लगेचच पडताळणी करून, सापळा रचण्यात आला. अगदी फिल्मी थरारासारखी ही कारवाई होती – तक्रारदाराने नोटांची बॅग पाटील यांच्याकडे दिली, आणि त्या क्षणी अ‍ॅन्टी करप्शन टीमने धाव घेत पाटील यांना रंगेहात पकडले.सदर कारवाई माणिकपूर पोलीस स्टेशन, वसई येथे गुन्हा भ्रष्टाचार अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही धडक मोहीम पोलिस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सुहास शिंदे, संजय गोविलकर यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस निरीक्षक सचिन मोरे (ACB, ठाणे) यांच्या पथकाने यशस्वी कारवाई केली आहे.

हेही वाचा: Bharat Gaurav Train : 'भारत गौरव' ट्रेनने शिवभक्तांची ऐतिहासिक यात्रा सुरू

शेअर करा