मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

UMC Election 2026 : उल्हासनगरमध्ये 'लक्ष्मी दर्शनाचा' प्रयत्न फसला! प्रचाराची सांगता होताच 50 लाखांची रोकड जप्त; भाजपवर संशयाची सुई

•समाजसेवक नरेश गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे रिक्षातील घबाड उघड; विठ्ठलवाडी पोलिसांत रिक्षाचालक ताब्यात

V
Vivek

1 मिनिट वाचन

UMC Election 2026 : उल्हासनगरमध्ये 'लक्ष्मी दर्शनाचा' प्रयत्न फसला! प्रचाराची सांगता होताच 50 लाखांची रोकड जप्त; भाजपवर संशयाची सुई

•समाजसेवक नरेश गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे रिक्षातील घबाड उघड; विठ्ठलवाडी पोलिसांत रिक्षाचालक ताब्यात

उल्हासनगर | उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या (UMC Election 2026) मतदानाला अवघे 24 तास उरले असताना शहरात पैशांच्या उधळणीचा संशय बळावला आहे. मंगळवारी (13 जानेवारी) सायंकाळी 5 वाजता जाहीर प्रचार संपल्यानंतर काही वेळातच सुभाष टेकडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एका रिक्षातून 50 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, समाजसेवक आणि अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी एका रिक्षाचा संशयास्पदरीत्या पाठलाग केला. ही रिक्षा कॅम्प नंबर 3 परिसरातून सुभाष टेकडीच्या दिशेने जात होती. आंबेडकर चौकात रिक्षा पोहोचताच गायकवाड यांनी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने रिक्षा अडवली. संशयास्पद बॅग पाहताच निवडणूक भरारी पथकाला पाचारण करण्यात आले. तपासणी केली असता, बॅगेत 50 लाख रुपयांच्या नोटांचे बंडल आढळले. प्राथमिक माहितीनुसार, रक्कमेची बॅग पाहताच रिक्षामधील काही लोक पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र पोलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आहे.

भाजपवर आरोपांच्या फैरी

या कारवाईनंतर अपक्ष उमेदवारांनी आणि विरोधकांनी ही रक्कम भाजपची असल्याचा थेट दावा केला आहे. "आम्ही या रक्कमेचा पाठलाग करत होतो आणि ही रक्कम मतदारांना वाटण्यासाठी नेली जात होती, याचे पुरावे आमच्याकडे आहेत," असे नरेश गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मात्र, भाजपने हे सर्व आरोप धुडकावून लावले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी स्पष्ट केले की, "जप्त केलेल्या रक्कमेशी भाजपचा कोणताही संबंध नाही. निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही अशा मार्गाचा अवलंब करत नाही."

हेही वाचा: BMC Election 2025 : 'मिनी विधानसभे'चा बिगुल वाजला; राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर

शेअर करा