मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Umar Khalid : उमर खालिदला अंतरिम जामीन मंजूर

Umar Khalid : उमर खालिदला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Umar Khalid : उमर खालिदला अंतरिम जामीन मंजूर

 Umar Khalid : उमर खालिदला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैयक्तिक कारणास्तव त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तो तुरुंगातून बाहेर येणार असून काही दिवस तो कारागृहाबाहेर राहणार आहे.

ANI :- दिल्ली दंगलीशी संबंधित प्रकरणातील आरोपी जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद  Umar Khalid याला बुधवारी (18 डिसेंबर) न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील कर्करडूमा न्यायालयाने त्यांना सात दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला.न्यायालयाने उमर खालिदला 28 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. उमर खालिदने आपल्या चुलत भाऊ आणि बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी 10 दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता.

डिसेंबरच्या सुरुवातीला उमर खालिद आणि मीरान हैदर यांनी समानता, खटल्याला होणारा विलंब आणि दीर्घ कारावास या कारणांवरून जामीनही मागितला होता. या प्रकरणी पोलिसांनी जबाब सादर करण्यासाठी वेळ मागितला होता.2020 च्या दिल्ली दंगलीत 53 लोक मारले गेले आणि 700 हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेनंतर उमर खालिदला 13 सप्टेंबर 2020 रोजी अटक करण्यात आली होती. चार वर्षांहून अधिक काळ ते तुरुंगात आहेत.

उमर खालिदने सुप्रीम कोर्टात जामीन अर्जही दाखल केला होता, पण कोर्टाने त्याला खालच्या कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. यानंतर उमरने आपली याचिका मागे घेतली.खालिदवर आयपीसी, 1967 शस्त्रास्त्र कायदा आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. याशिवाय आयपीसीच्या विविध कलमान्वयेही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शेअर करा