मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Uddhav Thackeray Shivsena : निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

•Bharat Kokate News : भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारत कोकाटे यांचा पक्षप्रवेश; भाजपाची ताकद वाढणार,नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ

V
Vivek

1 मिनिट वाचन

Uddhav Thackeray Shivsena : निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

•Bharat Kokate News : भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारत कोकाटे यांचा पक्षप्रवेश; भाजपाची ताकद वाढणार,नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ

मुंबई :- राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला नाशिक जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. सिन्नर तालुक्यातील महत्त्वाचे नेते आणि क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी ठाकरे गटाची साथ सोडत थेट भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भारत कोकाटे यांचा हा पक्षप्रवेश पार पडला आहे.

पक्षप्रवेशाला महत्त्व का?

भारत कोकाटे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगदी तोंडावर हा निर्णय घेतल्याने याला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. भारत कोकाटे यांनी 2022 साली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी भाजपची वाट धरली आहे.

कोण आहेत भारत कोकाटे?

भारत कोकाटे हे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू आहेत, मात्र गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही भावांमध्ये राजकीय मतभेद आहेत. भारत कोकाटे हे सोमठाणे गावाचे सरपंच राहिलेले आहेत. तसेच, त्यांनी नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केलेले आहे.

सिन्नर तालुक्यात भारत कोकाटे यांची चांगली राजकीय ताकद मानली जाते. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे सिन्नर तालुक्यात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता असून, याचा थेट फायदा भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होऊ शकतो, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.

या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, "भारत कोकाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला बळ मिळेल. मी भारत कोकाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करतो."

हेही वाचा: Bhiwandi Drugs News : भिवंडीत अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई! माणकोली उड्डाणपुलाजवळ दुचाकीवरून तस्करी करणाऱ्या उल्हासनगरच्या 2 तरुणांना अटक; 84 लाखांचा गांजा जप्त

शेअर करा