मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bhiwandi Drugs News : भिवंडीत अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई! माणकोली उड्डाणपुलाजवळ दुचाकीवरून तस्करी करणाऱ्या उल्हासनगरच्या 2 तरुणांना अटक; 84 लाखांचा गांजा जप्त

•दुचाकीच्या डिकीत तब्बल 10 किलो वजनाचा गांजा आढळला; दोघांविरोधात 'एनडीपीएस' कायद्यान्वये गुन्हा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bhiwandi Drugs News : भिवंडीत अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई! माणकोली उड्डाणपुलाजवळ दुचाकीवरून तस्करी करणाऱ्या उल्हासनगरच्या 2 तरुणांना अटक; 84 लाखांचा गांजा जप्त

•दुचाकीच्या डिकीत तब्बल 10 किलो वजनाचा गांजा आढळला; दोघांविरोधात 'एनडीपीएस' कायद्यान्वये गुन्हा

भिवंडी :- ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली असतानाच, भिवंडी येथील नारपोली पोलिसांनी बुधवारी रात्री मोठी कारवाई करत उल्हासनगरच्या दोन तरुणांना सुमारे 84 लाख 47 हजार रुपये किमतीच्या गांजासह रंगेहाथ पकडले आहे.

बुधवारी रात्री नारपोली पोलीस माणकोली उड्डाण पुलाच्या भिवंडी हद्दीत गस्त घालत होते. यावेळी साई सहारा हॉटेल समोरील सार्वजनिक रस्त्यावर संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू होती. पोलिसांना दोन तरुण दुचाकीवरून अवजड वाहनांचा आडोसा घेऊन सुसाट वेगाने पोलिसांची नजर चुकवून जात असल्याचे आढळले.

दुचाकीच्या डिकीत 10 किलो गांजा

संशय आल्याने पोलिसांनी या तरुणांचा पाठलाग करून त्यांना रोखले. घाई असल्याचे सांगत तरुणांनी पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्या दुचाकीतील साधन पेटीची (डिकी) तपासणी केली असता, त्यामध्ये गांजाची हिरवी सुकलेली बोंडे आणि पाने आढळली.

जप्त केलेला गांजा 516 ग्रॅम वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये बंदिस्त केलेला होता, ज्याचे एकूण वजन 10 हजार ग्रॅम (10 किलो) भरले. हा संकरित गांजा असून बाजारात त्याची किंमत 84 लाख 47 हजार इतकी आहे.

पोलिसांनी आकाश रमेश गुप्ता (24 वय, रा. उल्हासनगर) आणि हर्ष रवी ब्राह्मणे (26 वय, रा. उल्हासनगर) या दोन्ही गांजा तस्करांना ताब्यात घेतले आहे. नारपोली पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या दोघांविरोधात अंमली पदार्थ तस्करी कायद्याने (NDPS Act) गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईमुळे गांजा तस्कर आता गांजाची ने-आण करण्यासाठी रात्रीच्या वेळी दुचाकींचा वापर करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. गेल्याच आठवड्यात कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या पुढाकाराने गांजाची तस्करी करणाऱ्या 17 जणांच्या आंतरराज्य टोळीवर 'मोक्का' (MCOCA) लावण्यात आला होता. या मोठ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नारपोली पोलिसांनी केलेली ही कामगिरी लक्षणीय मानली जात आहे.

हेही वाचा: Rahul Gandhi : "पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरतात!" रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यावरून राहुल गांधींचा खोचक हल्ला

शेअर करा