मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Uddhav Thackeray : "कम ऑन, किल मी!" — उद्धव ठाकरेंचं गद्दारांना थेट आव्हान

• "मराठी माणूस एकत्र येऊ नये, यासाठी दिल्लीतील नोकरांचे डाव",वर्धापन दिनी भाजप-शिंदे गटावर घणाघात

V
Vivek

1 मिनिट वाचन

Uddhav Thackeray

• "मराठी माणूस एकत्र येऊ नये, यासाठी दिल्लीतील नोकरांचे डाव",वर्धापन दिनी भाजप-शिंदे गटावर घणाघात

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा 59 वा वर्धापनदिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उत्साहात साजरा झाला. मात्र, हा सोहळा फक्त एक उत्सव न राहता, भाजप आणि शिंदे गटावर झालेल्या तीव्र राजकीय टीकेने रणसंग्रामात रूपांतरित झाला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं — "गद्दारांपुढे झुकणार नाही, उलट सामना करायला तयार आहे. हिंमत असेल तर या — पण रुग्णवाहिका घेऊनच या!"

कार्यकर्त्यांना जोमाने प्रेरित करत उद्धव ठाकरे म्हणाले, “पक्षाचे नाव, बाळासाहेबांचा ब्रँड मिटवायचा प्रयत्न कोणी करत असेल, तर त्याचेच नामोनिशाण आम्ही राज्यातून पुसून टाकू.” त्यांचा रोख थेट भाजपा आणि एकनाथ शिंदे गटावर होता. ठाकरे म्हणाले, “मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून दिल्लीतील शेठजींचे नोकर आणि त्यांच्या नोकरांचे नोकर षड्यंत्र रचत आहेत.”

‘प्रहार’ डायलॉगचा उद्धव ठाकरेंकडून वापर

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटातील प्रसंग उधृत करत गद्दारांना उद्देशून ठणकावलं —
"कम ऑन, किल मी. हिंमत असेल तर या अंगावर. पण येताना रुग्णवाहिका घेऊन या, कारण जाताना आडवे होऊन जाल."

राज ठाकरेंबरोबर युतीचे संकेत

शिवसेना भवनात आणि सभागृहाबाहेर चर्चेचा विषय ठरलेला मुद्दा म्हणजे राज ठाकरे यांच्याशी संभाव्य युती. यावर स्पष्ट न बोलता, उद्धव ठाकरे म्हणाले, “काय होणार? होणार का? होणार की नाही? हे लवकरच कळेल. जे कार्यकर्त्यांच्या मनात आहे, राज्याच्या मनात आहे, तेच मी करीन.” या वक्तव्यातून राजकीय भूकंपाची चाहूल लागली आहे.

हेही वाचा: Pune Police : धबधबा वाढला… जीव अडकला… पण ‘खाकी’ धावली!

शेअर करा