मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Police : धबधबा वाढला… जीव अडकला… पण ‘खाकी’ धावली!

• स्वतःचा जीव धोक्यात घालून खराडी पोलिसांची शौर्यगाथा; क्षणोक्षणीचा थरार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Police : धबधबा वाढला… जीव अडकला… पण ‘खाकी’ धावली!

•स्वतःचा जीव धोक्यात घालून खराडी पोलिसांची शौर्यगाथा; क्षणोक्षणीचा थरार

पुणे :- जीव धोक्यात… चारही बाजूंनी नदीचा रौद्ररूप… आणि मृत्यू फक्त काही मीटर अंतरावर! पण अशा क्षणी खराडी पोलिसांनी जो पराक्रम केला, त्याला ‘धाडस’ म्हणणं पुरेसं ठरणार नाही — तो एक शौर्यप्रसंग ठरला!

गुरुवारी दुपारी सुमारे 2.30 वाजता मुळा-मुठा नदीवर पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याची माहिती मिळाल्यावर सपोनि खांडेकर व पथक तात्काळ घटनास्थळी गेले. केशवनगर मार्गावरील बंधाऱ्यावर पोहचताच, त्यांना एक इसम मोटरसायकलसह बंधाऱ्याच्या मध्यभागी अडकलेला दिसला. पाहता पाहता पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत गेला आणि त्याचा जीव अक्षरशः तासाच्या काट्यावर येऊन ठेपला!

मुळामुठेच्या पुरात वाहू पाहणाऱ्या पोलिसांनी मानवी साखळीने दिलं जीवनदान फायर ब्रिगेडला माहिती दिली असली तरी, वेळ कमी होता आणि धोका मोठा! तेव्हा खराडी पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न करता दोरी घेऊन मानवी साखळी तयार केली. सपोनि खांडेकर, अंमलदार दोरगे, सय्यद, गायकवाड, महिला अंमलदार थोरात, मालवंडे, साळके व काळे यांनी पाण्याच्या प्रवाहात उतरून नवाज खुर्शीद कोतवाल (वय 38, रा. तुकाराम नगर) याला बाहेर ओढलं आणि मृत्यूच्या दारातून परत आणलं.

घटनास्थळावरील रस्ता तत्काळ बंद करण्यात आला असून बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले. खराडी पोलिसांच्या वेळीच दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि पराक्रमामुळे एक निरपराध जीव वाचला आणि समाजात खाकी वर्दीबद्दलचा विश्वास अधिक घट्ट झाला!

हेही वाचा: Mumbai Crime News : वसईत चोरांचा 'रिक्षा रॅकेट' उद्धवस्त! गुन्हे शाखेची थरारक कारवाई; 4 चोरीच्या रिक्षा एका सराईताकडून जप्त

शेअर करा