Ratnagiri News : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : उदय सामंत
Ratnagiri News : रत्नागिरी : राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असून, शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
1 मिनिट वाचन

Ratnagiri News : रत्नागिरी : राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असून, शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत असून, सरकार बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ Ratnagiri News
दुष्काळाच्या परिस्थितीवर विरोधकांनी राजकारण करू नये, असे आवाहन सामंत यांनी केले. शेतकऱ्यांमुळेच राज्यातील प्रत्येक घराची चूल पेटते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राने एकसंघपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोकणातील परिस्थितीबाबत बोलताना सामंत यांनी, पुढील चार-पाच दिवस पाऊस न झाल्यास नुकसानीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली. २६५ तालुक्यांच्या यादीत एखाद्या तालुक्याचा समावेश नसला, तरी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वेक्षण आणि पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री म्हणून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रायगडमध्ये भरतशेठ गोगावले, तर सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे यांनीही सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.
कोकणातील भात आणि नाचणी उत्पादक शेतकऱ्यांनाही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास मदत करण्याची सरकारची भूमिका असल्याचे सामंत यांनी सांगितले. दरम्यान, दापोलीतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत अद्याप अधिसूचना निघालेली नसून, सामंजस्य करार झाला म्हणजे प्रकल्प प्रत्यक्षात आला असे होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक शेतकरी आणि प्रकल्पबाधितांना विश्वासात घेतल्याशिवाय उद्योग विभाग पुढे कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचेही सामंत यांनी सांगितले.




