मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

U-19 World Cup : भारत पुन्हा 'विश्वविजेता'! अंडर-19 वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडचा 100 धावांनी पराभव; सहाव्यांदा कोरले जेतेपदावर नाव

•वैभव सूर्यवंशीची 175 धावांची वादळी खेळी; 411 धावांचा डोंगर उभारून भारताने रचला इतिहास

V
Vivek

1 मिनिट वाचन

U-19 World Cup : भारत पुन्हा 'विश्वविजेता'! अंडर-19 वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडचा 100 धावांनी पराभव; सहाव्यांदा कोरले जेतेपदावर नाव

•वैभव सूर्यवंशीची 175 धावांची वादळी खेळी; 411 धावांचा डोंगर उभारून भारताने रचला इतिहास

U-19 World Cup win Ind | झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लबवर आज भारतीय युवा संघाने नवा इतिहास रचला आहे. अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत 'विश्वविजेते' होण्याचा मान पटकावला. सलामीवीर वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर भारताने सहाव्यांदा हे जेतेपद पटकावले आहे.

वैभव-आयुषची 'विराट' भागीदारी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात अडखळती झाली होती. आरोन जॉर्ज (9) लवकर बाद झाला. मात्र, त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले.

वैभव सूर्यवंशी: अवघ्या 80 चेंडूत 175 धावा (15 चौकार, 15 षटकार). वैभवने 55 चेंडूत शतक पूर्ण केले, जे स्पर्धेच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले.

आयुष म्हात्रे: 51 चेंडूत 53 धावांची संयमी खेळी करत वैभवला मोलाची साथ दिली.

अंतिम धावसंख्या: शेवटी अभिज्ञान कुंडू (40) आणि कनिष्क चौहान (37*) यांच्या छोटेखानी खेळींमुळे भारताने 9 बाद 411 धावांचा डोंगर उभा केला.

इंग्लंडचा प्रतिकार ठरला अपुरा

412 धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीलाच धक्का बसला. जोसेफ मुरेस 17 धावांवर बाद झाला. त्यानंतर बेन डॉकिन्स (66) आणि बेन मेयस (45) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात ते अडकले. कॅलेब मॅथ्यू फाल्कनरने अखेरपर्यंत झुंज दिली, पण विकेट्स पडत गेल्याने इंग्लंडचा डाव 311 धावांत आटोपला.

वैभव सूर्यवंशीचे विश्वविक्रम

1.एका डावात सर्वाधिक षटकार: अंतिम सामन्यात 15 षटकार मारून वैभवने नवा जागतिक विक्रम रचला.

2.सर्वात वेगवान शतक: 55 चेंडूंत शतक झळकावून तो स्पर्धेतील सर्वात वेगवान शतकवीरांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला.

3.स्पर्धेतील कामगिरी: या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वैभव दुसऱ्या स्थानी राहिला.

भारताचे अंडर-19 विश्वविजेतेपद

2000: मोहम्मद कैफ (कर्णधार)
2008: विराट कोहली (कर्णधार)
2012: उन्मुक्त चंद (कर्णधार)
2018: पृथ्वी शॉ (कर्णधार)
2022: यश धुल (कर्णधार)
2026: आयुष म्हात्रे (कर्णधार)

हेही वाचा: Sunetra Pawar : बारामतीत 'दादां'शिवाय पहिल्यांदाच मतदान! सुनेत्रा पवारांनी पाळली अजितदादांची परंपरा; पुणे जिल्ह्यात चुरस वाढली

शेअर करा