मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

नऱ्हे येथे दोन तरुण जेरबंद; पिस्तूल, चार जिवंत काडतुसे जप्त

शहरात पुन्हा एकदा बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या हालचालींबाबत चिंता व्यक्त होत आहे

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

नऱ्हे येथे दोन तरुण जेरबंद; पिस्तूल, चार जिवंत काडतुसे जप्त

शहरात पुन्हा एकदा बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या हालचालींबाबत चिंता व्यक्त होत आहे

पुणे, एप्रिल १०, महाराष्ट्र मिरर: शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल अशा प्रकारे अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या दोन उच्चशिक्षित तरुणांना न-हे पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून अटक केली. अभिरुची मॉलजवळील द्वारका लॉजमधील एका खोलीतून पोलिसांनी एक पिस्टल, चार जिवंत काडतुसे आणि मोबाईल फोन जप्त करत ही कारवाई केली. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या हालचालींबाबत चिंता व्यक्त होत आहे.

दि. ६ एप्रिल २०२६ रोजी न-हे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे आणि त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांना विश्वासार्ह बातमी मिळाली. अभिरुची मॉलच्या बाजूला असलेल्या द्वारका लॉजमधील रूम क्रमांक २०५ मध्ये काही तरुणांकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संबंधित खोलीवर धाड टाकत दरवाजा उघडून तपासणी केली असता आत दोन तरुण आढळले.

चौकशीदरम्यान या तरुणांनी आपली नावे साहिल सतिश मेहेर (वय ३१, मूळ रहिवासी अहिल्यानगर) आणि शुभम सचिन अजेटराव (वय २१, कात्रज) अशी सांगितली. पोलिसांनी त्यांच्या बॅगची झडती घेतली असता एका प्लास्टिकच्या पिशवीत लपवलेले लोखंडी पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच दोन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले.

या प्रकरणी दोघांविरुद्ध आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र डोईफोडे करीत आहेत. या कारवाईतून पोलिसांनी संभाव्य गुन्हा उघडकीस येण्यापूर्वीच रोखल्याचे मानले जात आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील प्रणील मेस्त्री, निलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण आणि कार्तिक कोंडे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

Two youths arrested in Narhe; Pistol, four live cartridges seized

शेअर करा