मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Tuljapur News : तुळजापुरात प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय अमीर पटेलची निर्घृण हत्या; अरबाज सय्यद गंभीर जखमी, १७ जणांवर सहभागाचा संशय!

Tuljapur News : तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत प्रेमप्रकरणाच्या वादातून एका १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

तुळजापुरात प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय अमीर पटेलची निर्घृण हत्या; अरबाज सय्यद गंभीर जखमी, १७ जणांवर सहभागाचा संशय!
तुळजापुरात प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय अमीर पटेलची निर्घृण हत्या; अरबाज सय्यद गंभीर जखमी, १७ जणांवर सहभागाचा संशय!

Tuljapur News : कुटुंबीयांना ओलीस ठेवून अमीरला जबरदस्तीने नेल्याचा आरोप; 'लव्ह जिहाद'च्या चर्चेने शहरात खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू

Tuljapur News : तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत प्रेमप्रकरणाच्या वादातून एका १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमीर पटेल असे मृत तरुणाचे नाव असून, या हल्ल्यात त्याच्यासोबत असलेला अरबाज सय्यद गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे तुळजापूर शहरात मोठी खळबळ उडाली असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.https://maharashtramirror.com/ Tuljapur News

नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमीर पटेल याचे तुळजापूर शहरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे. या प्रेमप्रकरणावरून यापूर्वी वाद निर्माण झाला होता. संबंधित प्रकरण मिटवण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी याच वादाचा राग मनात धरून तरुणीच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी अमीरवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे.https://maharashtramirror.com/ Tuljapur News

धक्कादायक बाब म्हणजे, हल्लेखोरांनी कुटुंबातील काही सदस्यांना ओलीस ठेवून अमीर पटेल याला जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप जखमी अरबाजच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर अमीरला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत अरबाज सय्यद यालाही गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

१७ जणांच्या सहभागाचा संशय; 'लव्ह जिहाद'ची चर्चा
या प्रकरणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या तब्बल १७ जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेला 'लव्ह जिहाद'शी जोडूनही शहरात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या चर्चेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

पोलिसांकडून तपास सुरू
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तपासाला सुरुवात केली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात नेमके किती जण सहभागी आहेत, हत्येमागील खरे कारण काय आणि घटनेचा घटनाक्रम नेमका कसा होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, या संवेदनशील प्रकरणावर पोलीस प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेमागील संपूर्ण सत्य समोर येणार आहे. तुळजापूरसारख्या धार्मिक आणि शांतताप्रिय शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात आणि आरोपींच्या सहभागाबाबत काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा