मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Torres Fraud : "झगमगाटाच्या आड दगाफटका! ‘टोरेस ज्वेलर्स’कडून करोडोंची फसवणूक उघड"

हिऱ्याच्या नावाखाली मोजेनाईट विक्री, आठवड्याला परतावा व लकी ड्रॉचे आमिष

V
Vivek

1 मिनिट वाचन

Torres Fraud

हिऱ्याच्या नावाखाली मोजेनाईट विक्री, आठवड्याला परतावा व लकी ड्रॉचे आमिष

कल्याण :- कल्याण खडकपाडा परिसरात झगमगणाऱ्या ‘टोरेस ज्वेलर्स’ शोरूमने नागरिकांच्या विश्वासाला तडा दिला आहे. सोनं, चांदी व हिऱ्यासारखे दिसणारे मोजेनाईट खडे विकून ग्राहकांना भरघोस परताव्याचं आणि लकी ड्रॉमधून गाडी, घर मिळवण्याचं स्वप्न दाखवत हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधींची गुंतवणूक उभी केली.

प्लॅटिनम हर्न प्रा. लि. या कंपनीच्या बॅनरखाली ग्राहकांना "दर आठवड्याला 4% ते 11% परतावा 52 आठवड्यांसाठी" देण्याचे आश्वासन देण्यात आले. विश्वासात घेत शोरूममधून दागिने विकले गेले. मात्र काही काळानंतर परतावा थांबला, आणि ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

कोट्यवधींची गुंतवणूक लाटून, ‘टोरेस’कडून गुंतवणूकदारांची फसवणूक; गुन्हा दाखल

या गंभीर आर्थिक फसवणुकीप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316(2), 316(5), 318(4), 3(5) आणि एमपीआडी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची धुरा ठाणे शहरातील आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय पाबळे यांनी केलेल्या जाहीर आवाहनानुसार, “जे गुंतवणूकदार अद्याप तक्रार दाखल केलेली नाही त्यांनी आपल्या गुंतवणुकीसंबंधी सर्व कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी तात्काळ संपर्क साधावा.”

शहरातील नामांकित शोरूमवर विश्वास ठेवून गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना फसवणुकीचा मोठा धक्का बसला आहे. हा प्रकार म्हणजे झगमगाटाच्या आड दडलेला काळा आर्थिक चेहरा आहे. आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा: Thane Police News : ठाणे पोलिस दलात बदल्यांचे वारे; निरीक्षकांसह उपनिरीक्षकांचीही बदली

शेअर करा