मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याबाबत पाकिस्तानातून धमकीचा मेसेज; पोलिसांकडून अधिक तपास

•व्हॉट्सॲपवरून धमकीचा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Devendra Fadnavis

•व्हॉट्सॲपवरून धमकीचा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संदेश पाठवणाऱ्याने त्याचे नाव मलिक शाहबाज हुमायून राजा देव असे दिले आहे.

मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सॲपवर आला होता. धमकीची माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पाकिस्तानी क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर हा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाला. बुधवारी दुपारी हा मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांचा तपास अलर्ट मोडवर टाकण्यात आला होता. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव मलिक शाहबाज हुमायून राजा देव असल्याचे उघड केले आहे. मेसेज पाठवणारी व्यक्ती भारतातील आहे की बाहेरची आहे याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

हेही वाचा: Pune Swargate Rape Case : पुण्यातील बसमधील बलात्काराचा आरोपी 70 तासांनंतर अटक, उसाच्या शेतात सापडला

शेअर करा