मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

"अजानवरील लाऊडस्पीकरबाबत मुस्लीम समाजाची भावना लक्षात घ्यावी" – आमदार अबू आझमींची मुख्यमंत्री फडणवीस यांना मागणी

पोलीस कारवाईमुळे मुस्लीम समाजात असंतोषाचे वातावरण – आजमी .

V
Vivek

1 मिनिट वाचन

"अजानवरील लाऊडस्पीकरबाबत मुस्लीम समाजाची भावना लक्षात घ्यावी" – आमदार अबू आझमींची मुख्यमंत्री फडणवीस यांना मागणी

पोलीस कारवाईमुळे मुस्लीम समाजात असंतोषाचे वातावरण – आजमी. पोलिस, मशीद प्रतिनिधी व मुस्लिम नेत्यांची संयुक्त बैठक घेण्याची विनंती

मुंबई :- समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मशिदींमध्ये अजानसाठी वापरल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकरविषयी निवेदन दिले. या निवेदनाद्वारे त्यांनी मुस्लीम समाजात वाढत चाललेल्या असंतोषाकडे लक्ष वेधले असून, सरकारने या विषयावर तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली आहे.

आजमी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, "मुंबई आणि महाराष्ट्रातील मुस्लिम समाज सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कायद्याचे पालन करत आहे. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती अजानवरील लाऊडस्पीकरबाबत आक्षेप घेत सांप्रदायिक तणाव निर्माण करत आहेत." त्यांनी विशेषतः माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कारवायांकडे लक्ष वेधले.

पोलीस अधिकारी मशिदींच्या ट्रस्टींवर लाऊडस्पीकर काढण्याचा दबाव टाकत असल्याचा आरोप करत आजमी म्हणाले की, "पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईमुळे लाखो मुस्लिमांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे." त्यांनी या विषयावर सर्व संबंधित पक्षांची – पोलिस अधिकारी, मशीद प्रतिनिधी, आणि मुस्लिम नेते – यांच्या सहभागाने एकत्र बैठक बोलवण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.

"संवाद आणि सहकार्यानेच या विषयावर मैत्रीपूर्ण तोडगा निघू शकतो," असेही आजमी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Amit Shah : ऑपरेशन सिंदूर' हे भारताच्या नव्या लढाऊ धोरणाचे प्रतीक – केंद्रीय गृहमंत्री

शेअर करा