मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Telegram channel वरील investment app मध्ये गुंतवणूक केल्यास अधिकच्या नफ्याचे आमिष, तब्बल 11 लाख 60 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक

• सायबर पोलिसांची कामगिरी ; फसवणुकीतील 7 लाख 20 हजार परत मिळवून देण्यास यश

V
Vivek

1 मिनिट वाचन

Online Fraud

•सायबर पोलिसांची कामगिरी ; फसवणुकीतील 7 लाख 20 हजार परत मिळवून देण्यास यश

विरार:- Telegram channel सायबर विभागाकडून ऑनलाइन फसवणुकीबाबत सातत्याने जनजागृती केली जात असतानाही विरारमध्ये पुन्हा एक सायबर फसवणुकीची घटनासमोर आली आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत फसवणुकीतील 11 लाख 60 हजार रुपयांपैकी 7 लाख 20 हजार रुपये परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या गुरव यांना टेलिग्राम चैनल वरून इन्व्हेस्टमेंट ॲप मध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा मिळेल अशी जाहिरात पाहिली होती. गुरव यांनी कोणत्याही प्रकारे त्या जाहिरातीची सत्यता पडताळणी न करता त्या ॲपमध्ये तब्बल 11 लाख 60 हजार रुपये गुंतवणूक केले होती. आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात गुरव यांनी सायबर विभागाला तक्रार दाखल केली होती. सायबर विभागाने गुरव यांनी केलेल्या ऑनलाईन व्यवहारा संदर्भातील सर्व रक्कम गोठविली. त्यानंतर संबंधित बँक आणि मर्चंट यांच्याशी व्यवहार करून न्यायालयांच्याकडून संबंध बँकेला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आले होते. सायबर विभागाच्या पोलिसांनी केलेली कामगिरीमुळे तक्रारदार यांच्या फसवणूक झालेल्या रकमेपैकी 7 लाख 20 हजार रुपये मूळ खात्यात परत देण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, पोलीस अंमलदार ओंकार डोंगरे, महिला पोलीस अंमलदार पल्लवी निकम, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे यांनी पार पाडली आहे

हेही वाचा: Sindhudurga Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला

शेअर करा