मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कौटूंबिक वादातून घाटात नेऊन पत्नीचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या पतीची झाडावर गळफास घेत आत्महत्या

उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

M
mubarak

1 मिनिट वाचन

Murder uttamnagar

उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे :- कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा डोक्यात दगडाने ठेचून ठार मारले त्यानंतर झाडाला गळफास घेऊन पतीची आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुलीच्या आईने उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून हकीकत सांगितले.

"माझी विवाहीत मुलगी सुवर्णा हीची सवत रंजना, तीची मुलगी स्नेहल हे जावई सोमनाथ सखाराम वाघ यांना वाईट सांगत असे व तो देखील त्यांचे ऐकुन तीला शिविगाळ करुन "तुला जीवंत ठेवणार नाही" असे म्हणुन बेदम मारहाण करित असे. तसेच तीची सवत रंजना व तीची मुलगी स्नेहल हे तीला सारखे टोमणे मारुन ठेवलेली बाई म्हणुन हिणवत होते. सुवर्णा हीचे पती, सवत हे नेहमी तीला "तुला आम्ही मुलांसाठी आणले आहे, तुझी मुले ठेऊन तुझे माहेरी निघुन जा, तुझी आम्हांला गरज नाही" असे बोलुन मानसिक त्रास देत असत. तसेच गेल्या महीन्यात सुवर्णा हीचे सवत सौ. रंजना व तीची मुलगी स्नेहल हीचे सांगणे वरुन नवरा सोमनाथ याने तीचे कपडे काढुन मारहाण केली होती. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.06 वा.चे सुमारास जावई सोमनाथ यांनी माझी मुलगी सुवर्णा हीला फिरायला जाणेचे बहाण्या वरुन घेऊन जाऊन कमळादेवी मंदीराचे पुढे पिकॉक बे, कुडजे, पुणे. येथे रस्त्याचे डावे बाजुस असलेल्या झाडांमध्ये नेऊन दगडाने ठेचुन तीला गंभीर जखमी करुन तीचा खुन केला व त्यानंतर तेथे असलेल्या एका झाडाला त्यांचे पॅन्टचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.म्हणुन माझी जावई सोमनाथ सखाराम वाघ, तसेच माझी मुलगी सुवर्णा हीचेबाबत रंजना सोमनाथ वाघ व स्नेहला सोमनाथ वाघ यांनी सोमनाथ वाघ यास नेहमी वाईट सांगुन तीचा खुन करणेस प्रवृत्त केले आहे म्हणुन माझी त्या तीघां विरुध्द तक्रार आहे." उत्तमनगर पोलीस ठाणे गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे

शेअर करा