मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Rain : पावसाचा पहिला तडाखा, अंडरग्राउंड मेट्रोची पहिली 'पाणीचट' परीक्षा!

वरळीतील नव्या मेट्रो स्थानकात पाणीच पाणी; प्रवाशांचा रोष, प्रशासन अडचणीत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठी रेड अलर्ट; लोकलसेवा 'रुळांवरच' ठप्प

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Rain : पावसाचा पहिला तडाखा, अंडरग्राउंड मेट्रोची पहिली 'पाणीचट' परीक्षा!

  • वरळीतील नव्या मेट्रो स्थानकात पाणीच पाणी; प्रवाशांचा रोष, प्रशासन अडचणीत
  • मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठी रेड अलर्ट; लोकलसेवा 'रुळांवरच' ठप्प
  • मुंबई :- मुंबईत मान्सूनने दमदार हजेरी लावली आणि शहराची प्रतिष्ठेची मेट्रो एक्वा लाइन-3 पहिल्याच पावसात चिखलात गेली! वरळीतील नव्याने सुरू झालेल्या अंडरग्राउंड मेट्रो स्थानकात सोमवारी सकाळी पाणी साचल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. काही तासांपूर्वीच उद्घाटन झालेल्या या प्रकल्पाची गुणवत्ता आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Mumbai Rain Latest News

    हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसामुळे शहराचा गतीमान प्रवास रुळावरच थांबला आहे. लोकल ट्रेनचा वेग कासवगतीचा झाला असून, ठाणे-मुंबई मार्गावरील प्रवाशांना अपार त्रास सहन करावा लागत आहे.

    "पहिलाच पाऊस आणि आधीच ट्रेन बंद? ऑफिसला वेळेत पोहोचायचं म्हणजे आता स्वप्नच!" असा संतप्त सवाल एका प्रवाशाने उपस्थित केला. काही प्रवाशांनी सरकारकडून ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. "अशी परिस्थिती तर खरी पावसाळा सुरु झाल्यावर काय होईल?" असा नागरिकांचा सवाल आहे.

    दरम्यान, मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात धाव घेतली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील विभागीय यंत्रणांची तयारी तपासली.

    25 मे रात्रीपासून 26 मे सकाळपर्यंत नोंदवलेले पावसाचे आकडे

    • नरीमन पॉइंट फायर स्टेशन – 252 मिमी
    • ए विभाग कार्यालय – 216 मिमी
    • कोलाबा डान्स सेंटर 207
    • नेत्र रुग्णालय, डॉन ताखी – 183 मिमी
    • वरळी ब्रिटानिया डान्स सेंटर – 171 मिमी
    • सांताक्रूझ, नारळवाडी शाळा – 103 मिमी
    • सुपारी टॅंक, बांद्रा - 101
    • जिल्हा मॅजिस्टर कॉलनी चेंबूर-82
    • एल विभाग कार्यालय कुर्ला - 76
    • शेअर करा