Mumbai Rain : पावसाचा पहिला तडाखा, अंडरग्राउंड मेट्रोची पहिली 'पाणीचट' परीक्षा!
वरळीतील नव्या मेट्रो स्थानकात पाणीच पाणी; प्रवाशांचा रोष, प्रशासन अडचणीत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठी रेड अलर्ट; लोकलसेवा 'रुळांवरच' ठप्प
1 मिनट पठन

मुंबई :- मुंबईत मान्सूनने दमदार हजेरी लावली आणि शहराची प्रतिष्ठेची मेट्रो एक्वा लाइन-3 पहिल्याच पावसात चिखलात गेली! वरळीतील नव्याने सुरू झालेल्या अंडरग्राउंड मेट्रो स्थानकात सोमवारी सकाळी पाणी साचल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. काही तासांपूर्वीच उद्घाटन झालेल्या या प्रकल्पाची गुणवत्ता आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Mumbai Rain Latest News
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसामुळे शहराचा गतीमान प्रवास रुळावरच थांबला आहे. लोकल ट्रेनचा वेग कासवगतीचा झाला असून, ठाणे-मुंबई मार्गावरील प्रवाशांना अपार त्रास सहन करावा लागत आहे.
"पहिलाच पाऊस आणि आधीच ट्रेन बंद? ऑफिसला वेळेत पोहोचायचं म्हणजे आता स्वप्नच!" असा संतप्त सवाल एका प्रवाशाने उपस्थित केला. काही प्रवाशांनी सरकारकडून ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. "अशी परिस्थिती तर खरी पावसाळा सुरु झाल्यावर काय होईल?" असा नागरिकांचा सवाल आहे.
दरम्यान, मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात धाव घेतली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील विभागीय यंत्रणांची तयारी तपासली.
