मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

ठाणे : दोन तडीपार गुंडांना अटक

Thane Police Tadipar Two Criminal : ठाणे सह, मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई जिल्ह्यातून तडीपार केलेल्या दोन गुंडांना वागळे इस्टेट पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अटक केली

V
Vivek

1 मिनिट वाचन

ठाणे : दोन तडीपार गुंडांना अटक

Thane Police Tadipar Two Criminal : ठाणे सह, मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई जिल्ह्यातून तडीपार केलेल्या दोन गुंडांना वागळे इस्टेट पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अटक केली

ठाणे :- मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई आणि ठाणे Mumbai Tadipar Criminal जिल्ह्यातून तडीपार केलेल्या दोन गुंडांना वागळे इस्टेट पोलिसांनी Wagle Estate Police दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अटक केली. या कारवाया मंगळवारी ( 17 सप्टेंबर) कल्पतरू आयटी पार्कसमोर अंबिका नगर-2 वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम येथे करण्यात आल्या. सूर्यभान उर्फ सुरज जिलाजीत यादव(21 वर्ष, रा. अंबिका नगर-2, वागळे इस्टेट ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.Thane Tadipar Criminal News

या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीसांनी सरकार तर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूर्यभान यादव याला पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 यांनी 18 महिन्याच्या कालावधी करिता जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्यांचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला. याप्रकरणी गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार महाले करत आहे. Thane Tadipar Criminal News

दुसऱ्या कारवाईमध्ये सक्षम ब्रिजेश सिंग उर्फ डॉन (22 वर्ष, रा. अंबिका नगर नं.2) याला अटक करण्यात आली आहे. प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सक्षम सिंग उर्फ डॉन यालाही वागळे इस्टेट पोलिसांनी 18 महिन्याच्या कालावधी करिता जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. शहरात वावर करत असल्याची याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. वागळे इस्टेट पोलीस हवालदार राणे तपास करीत आहेत. दोन्ही आरोपींच्या विरोधात वागळे इस्टेट स्टेट पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Thane Tadipar Criminal News

हेही वाचा: Bangladesh cricket team : बांगलादेशी संघाच्या भारत दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी केंद्राला धारेवर धरले, 'जेव्हा तिथे हिंदूंवर हल्ले होतात…'

शेअर करा