मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Crime News : दिवाळीच्या पूर्व संध्येला कारवाई ; बंदूक आणि चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक

Kalwa Police Arrested Man With Illegal Gun And Weapon : कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर बंदूक, काडतुसे आणि चाकू तसेच चोरलेली बुलेट घेऊन फिरणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे

V
Vivek

2 मिनिट वाचन

Illegal Weapon News

Kalwa Police Arrested Man With Illegal Gun And Weapon : कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर बंदूक, काडतुसे आणि चाकू तसेच चोरलेली बुलेट घेऊन फिरणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे

ठाणे :- दिवाळीच्या पूर्व संध्येला बंदुक Illegal Gun आणि चाकू घेवून फिरणाऱ्या व्यक्तीला कळवा पोलिसांनी अटक केली. Kalwa Police Arrested Man With Illegal Gun त्याच्याकडून बंदुकीसह एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई सहकार विद्यालय समोर सार्वजनिक रोड जवळ करण्यात आली. आरोपीचे नाव तुषार राहुल सक्सेना (वय 19) असे आहे. तो रबाळे येथील साईनगर झोपडपट्टी येथे राहणारा आहे. Thane Latest Crime News

पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, ठाणे बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग, उत्तम कोळेकर यांनी विधानसभा निवडणुकीची लगबग आणि दिवाळीचा जल्लोष या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहे.त्यानुषंगाने कळवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडे यांच्या पथकाला गोपनीय बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, सहकार विद्यालयाच्या समोर सार्वजनिक रोडवर कळवा येथे एक व्यक्तीच्या जवळ पिस्तूल आणि चाकू असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ पोलिसांनी पिस्तूल, चाकू, जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याजवळ असलेल्या बुलेट बाईकही आरोपीने रबाळे येथून चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासून निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात फिर्यादी देत भारतीय हत्यार कायदा कलम 3 (1),25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळे हे करत आहे. Thane Latest Crime News

पोलीस पथक

पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, ठाणे बुरसे, राहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग, उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळवा पोलीस ठाणे अशोक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडे व त्यांचे पथक यांनी केली आहे. Thane Latest Crime News

हेही वाचा: हिरानंदानी ठाणे येथे इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या!

हेही वाचा: Thane Crime News : घरफोडी व चोरी करणारे जेरबंद; ‘इतक्या’ लाखांचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त

शेअर करा