मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

18 वर्षांनी एकत्र ठाकरे बंधू; सुप्रिया सुळे यांनी मिळवून दिला 'ठाकरे फ्रेम'!

• त्रिभाषा सूत्राविरोधातील विजयी मेळाव्यात ठाकरे कुटुंबाचा भावनिक क्षण

V
Vivek

1 मिनिट वाचन

18 वर्षांनी एकत्र ठाकरे बंधू; सुप्रिया सुळे यांनी मिळवून दिला 'ठाकरे फ्रेम'!

•त्रिभाषा सूत्राविरोधातील विजयी मेळाव्यात ठाकरे कुटुंबाचा भावनिक क्षण

मुंबई | हिंदी सक्ती व त्रिभाषा सूत्राविरोधात शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या विजयी मेळाव्याचा काल (5 जुलै) ऐतिहासिक क्षण ठरला. 18 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. कार्यक्रमाच्या अखेरीस मंचावर जमलेले दृश्य अनेक राजकीय चाहत्यांच्या आणि मराठी अस्मितेच्या अंगणात आशेचा किरण देणारे ठरले.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

कार्यक्रम संपल्यानंतर, उपस्थित सर्वच पक्षांचे नेते व्यासपीठावर एकत्र आले. याच वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना एकत्र उभं केलं. त्यांनी आदित्य यांचा हात धरून राज ठाकरे यांच्याजवळ उभं केलं, तर उद्धव ठाकरे यांनी स्वत: अमित ठाकरे यांना आपल्या बाजूला बोलावलं.

यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटोही काढला. ज्यात आदित्य ठाकरे हे राज ठाकरे यांच्या बाजूला, तर अमित ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या शेजारी उभे होते. हे दृश्य पाहून अनेकांना भावनिक आनंद मिळाला. राजकीय असहमतीच्या पार्श्वभूमीवर, हा ठाकरे कुटुंबाचा ऐक्य संदेश देणारा क्षण ठरला.

हेही वाचा: Vijayi Melava : मराठीसाठी एकत्र! वरळीत उद्धव-राज ठाकरेंचा शक्तीप्रदर्शन मेळावा

शेअर करा