मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vijayi Melava : मराठीसाठी एकत्र! वरळीत उद्धव-राज ठाकरेंचा शक्तीप्रदर्शन मेळावा

• आमचं एकत्र दिसणं हाच खरा संदेश!" – उद्धव ठाकरे; " मराठीची एकजूट कायम राहो!" – राज ठाकरे

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vijayi Melava : मराठीसाठी एकत्र! वरळीत उद्धव-राज ठाकरेंचा शक्तीप्रदर्शन मेळावा

•आमचं एकत्र दिसणं हाच खरा संदेश!" – उद्धव ठाकरे;
"मराठीची एकजूट कायम राहो!" – राज ठाकरे

मुंबई | हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राच्या विरोधात राज्यभर तापलेल्या वातावरणात अखेर राज्य सरकारने माघार घेतल्यानंतर, मराठीचा आवाज बुलंद करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (ठाकरे गट) ने आज (5 जुलै) मुंबईच्या वरळी येथे विजयी मेळाव्याचं आयोजन केलं. या मेळाव्यात सर्वात मोठा लक्षवेधी क्षण ठरला – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र व्यासपीठावर येणं आणि स्पष्ट संकेत देणं की, ही एकता मराठीसाठीच्या पुढील लढ्यांची नांदी ठरेल.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज ठाकरे यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करत, दोघांतील संबंध सुधारल्याचे चित्र उभं केलं. "राजने भाषणाची सुरुवात ‘सन्माननीय’ असं म्हणत केली, त्यामुळे मीही त्याचा उल्लेख 'सन्माननीय राज ठाकरे' असाच करतोय," असं म्हणत उद्धव यांनी भावनिक सुर लावला.

तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, "आमचं एकत्र दिसणं हाच खरा संदेश आहे. भाषणांपेक्षा तो महत्त्वाचा आहे. अण्णाजीपंतांनी आमच्यातलं अंतर दूर केलं आहे. आता आम्ही दोघं एकत्र आलोय – एकत्र राहण्यासाठी."

उद्धव ठाकरे यांनी यावेळी सामाजिक अंधश्रद्धा, बुवाबाजी, अंगारे-धुपारे करणाऱ्यांवरही टीका करत म्हणाले, "आज अनेक बुवा, महाराज विविध प्रकारात व्यस्त आहेत. कोणी लिंबू कापतोय, कोणी अंगारे करतोय. पण, माझ्या आजोबांनी – प्रबोधनकार ठाकरे यांनी या बोंदूपणाविरोधात लढा दिला होता. त्यांचेच वारस म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत."

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाषणात मराठीसाठी एकजूट टिकवण्याचा संदेश दिला. "हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला गेला असला तरी पुढे काय होईल, माहित नाही. त्यामुळे मराठीसाठी आपली एकजूट आवश्यक आहे. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पुन्हा साकारावं, अशी माझी इच्छा आहे," असं ते म्हणाले.

हेही वाचा: Raj Thackeray : "फडणवीसांनी जे जमवलं ते कुणालाही जमलं नाही!" – राज ठाकरे

शेअर करा