मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Telegram Fraud News : टेलिग्राम ग्रुपद्वारे फसवणूक करणाऱ्याचे 2.55 लाख रुपये गोठविले, सायबर पोलिसांची कामगिरी

Telegram Online Scam : टेलिग्रामवर ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून लाटण्यात आलेल्या 2.55 लाख रुपयांचा शोध पोलिसांनी घेतला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Telegram Fraud News : टेलिग्राम ग्रुपद्वारे फसवणूक करणाऱ्याचे 2.55 लाख रुपये गोठविले, सायबर पोलिसांची कामगिरी

Telegram Online Scam : टेलिग्रामवर ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून लाटण्यात आलेल्या 2.55 लाख रुपयांचा शोध पोलिसांनी घेतला. या वेळी पोलिसांना फसवणूक करणाऱ्याच्या खात्यातील रक्कम गोठविण्यात यश आले.

विरार :- टेलिग्रामवर ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे Telegram Scam जादा परताव्याचे आमिष दाखवून लाटण्यात आलेल्या 2.55 लाख रुपयांचा शोध पोलिसांनी घेतला. Vasai Virar Police या वेळी पोलिसांना फसवणूक करणाऱ्याच्या खात्यातील 2 लाख 55 हजार 107 रुपयांची रक्कम गोठविण्यात यश आले. 'टेलिग्राम अँप वरून' ग्रुपवरून शेअर मार्केट करिता ट्रेडिंग केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत विरार येथील चौधरी यांचे 2 लाख 55 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेलिग्राम ॲप वरुन मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या चौधरी यांना ऑनलाइन ट्रेडिंगबाबत माहिती देण्यात आली होती. ट्रेडिंग करण्यासाठी चौधरी यांनी दोन लाख 55 हजार रुपयांची ऑनलाइन गुंतवणूक केली होती. परंतु गुंतवणूक केलेल्या रकमेत कोणताही नफा परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात चौधरी यांनी सायबर पोलिसांच्या NCCRP Portal तक्रारदार दाखल केली होती. पोलिसांनी यानंतर फसवणुकीतील रक्कम शोधन घेऊन सर्व रक्कम पोलिसांनी गोठविण्यात यश आले. पोलिसांनी न्यायालय आणि बँकेची पत्रव्यवहार करून फसवणुकीतील रक्कम चौधरी यांच्या मूळ खात्यावर परत मिळवून देण्यास यश आले आहे.

Avinash-Ambure

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, सहाय्यक फौजदार मिलाग्रिस फर्नाडिस, पोलीस अंमलदार सावन शेवाळे, प्रशांत बोरकर महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे यांनी पार पाडली आहे.

शेअर करा