मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Team India : टीम इंडियाला टेन्शन! यशस्वी जयस्वाल रुग्णालयात दाखल; ‘फूड पॉयझनिंग’मुळे 2 किलो वजन घटले

Yashasv i Jaiswal : पुण्यातील हॉटेलमधील जेवण बेतले जिवावर; विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता

V
Vivek

1 मिनिट वाचन

Team India : टीम इंडियाला टेन्शन! यशस्वी जयस्वाल रुग्णालयात दाखल; ‘फूड पॉयझनिंग’मुळे 2 किलो वजन घटले

Yashasvi Jaiswal : पुण्यातील हॉटेलमधील जेवण बेतले जिवावर; विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता

मुंबई | भारतीय क्रिकेटचा उगवता तारा यशस्वी जयस्वाल याला भीषण अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबई आणि राजस्थान दरम्यानच्या 'सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी' सामन्यादरम्यान जयस्वालच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला हा साधा त्रास वाटत असला, तरी वैद्यकीय तपासणीत त्याला तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस (पोट आणि आतड्यांची जळजळ) झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुण्यातील जेवण पडले महागात मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका हॉटेलमध्ये जेवल्यामुळे जयस्वालला हा त्रास सुरू झाला. पोटात तीव्र कळा येत असल्यामुळे त्याला तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र, या आजारपणामुळे गेल्या दोन दिवसांत त्याचे दोन किलोपेक्षा जास्त वजन कमी झाले असून तो शारीरिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे.

डॉक्टरांनी दिला सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला यशस्वी जयस्वालला सध्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तो मुंबईत परतला आहे. मात्र, त्याची प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्याला पुढील 7 ते 10 दिवस पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या काळात त्याला जड शारीरिक श्रम किंवा क्रिकेटच्या मैदानावर उतरता येणार नाही.

विजय हजारे ट्रॉफीवर अनिश्चिततेचे सावट मुंबईचा संघ 24 डिसेंबरपासून सिक्कीमविरुद्धच्या सामन्याने विजय हजारे ट्रॉफी मोहिमेला सुरुवात करणार आहे. या स्पर्धेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मुंबईसाठी सलामीला येणार होती. मात्र, जयस्वालच्या प्रकृतीमुळे तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची दाट शक्यता आहे. रोहित आणि यशस्वी या जोडीला मैदानावर पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

शेअर करा