मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

ताडीवाला रस्ता ॲसिड हल्ला प्रकरणातील संशयिताला २४ तासांत बेड्या

वेशभूषा बदलून पळणाऱ्या नराधमाला कर्नाटकच्या हुबळीमधून घेतले ताब्यात

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

ताडीवाला रस्ता ॲसिड हल्ला प्रकरणातील संशयिताला २४ तासांत बेड्या

वेशभूषा बदलून पळणाऱ्या नराधमाला कर्नाटकच्या हुबळीमधून घेतले ताब्यात

पुणे: ताडीवाला रस्ता परिसरात प्रेमप्रकरणातून एका तरुणीवर अमानुषपणे ॲसिड हल्ला करून फरार झालेल्या नराधम आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केवळ २४ तासांच्या आत कर्नाटक राज्यातील हुबळी येथून शिताफीने अटक केली आहे.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

स्वतःची ओळख लपवण्यासाठी आरोपी प्रवासादरम्यान तीन वेळा वेशभूषा बदलून पळत होता; मात्र पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि आरपीएफच्या मदतीने त्याला बस स्थानकावर बेड्या ठोकल्या.

श्रीराम वधू सावनेर (वय ३०, रा. बैतुल जिल्हा, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२४(१) आणि ३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार (ता. २०) रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ताडीवाला रस्ता परिसरात घडली होती.

५० हून अधिक सीसीटीव्हीच्या तपासातून माग काढला
ताडीवाला रस्त्यावरील या गंभीर घटनेनंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. त्यानुसार खंडणी विरोधी पथक-२ आणि गुन्हे शाखा युनिट-६ च्या संयुक्त पथकाने ताडीवाला रस्ता आणि पुणे स्टेशन परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही चित्रीकरण (फुटेज) तपासले. यामध्ये संशयित आरोपीची ओळख पटली आणि तो घटनेनंतर ‘चालुक्य एक्स्प्रेस’ या रेल्वे गाडीत बसून पळून गेल्याचे निष्पन्न झाले.

तीन वेळा वेशभूषा बदलून केला प्रवास
आरोपीचा माग काढण्यासाठी पोलीस पथक तात्काळ रेल्वेच्या मार्गावर रवाना झाले. तपासादरम्यान पोलिसांना चकवा देण्यासाठी आणि स्वतःची ओळख लपवण्यासाठी आरोपीने रेल्वे प्रवासात तब्बल तीन वेळा आपली वेशभूषा (कपडे) बदलली होती. तो सातत्याने स्वतःचे लपण्याचे ठिकाण बदलत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

कर्नाटकातील हुबळीमध्ये टाकला दरोडा
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा अचूक माग काढला. रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) पथकाशी संपर्क साधून त्यांनाही सतर्क करण्यात आले. अखेर हुबळी (राज्य कर्नाटक) येथील गोलक रस्त्यावरील नवीन बस स्थानक परिसरात पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि आरोपी श्रीराम सावनेर याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने संबंधित तरुणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांच्या वादातून हा ॲसिड हल्ला केल्याची कबुली दिली.

ही धडक कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-२ चे पोलीस निरीक्षक राम राजमाने, युनिट-६ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, तानाजी देशमुख, जामगे, पवन भोसले, काटे, घावटे, कुसाळकर, आढारी, राऊत, शेख, अजिनाथ येडे, उदय राक्षे, आझाद पाटील आणि प्रशांत शिंदे यांच्या पथकाने केली.

पुणे क्राईम न्यूज

शेअर करा